Schoolympics 2019 : भाविका, श्रुती, जान्हवी उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

निशिगंधा, भाग्यश्री, आकांक्षा, मैत्रेयी यांची आगेकूच

हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूलच्या भाग्यश्री हुक्केरी व आकांक्षा लांडेला प्रतिस्पर्धी न आल्याने पुढे चाल मिळाली.

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलींच्या दुहेरी टेनिस स्पर्धेत भाविका राजोपाध्ये व श्रुती शंकरगौडा, जान्हवी निवळे व निशिगंधा पाटील, भाग्यश्री हुक्केरी व आकांक्षा लांडे, मैत्रेयी इंगळे व समीक्षा पाटीलने उपांत्य फेरीत आज धडक मारली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू आहे. 

घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या भाविका राजोपाध्ये व श्रुती शंकरगौडाने हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूलच्या सृष्टी माळी व अंजली मुदगलवर ६-१, हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूलच्या जान्हवी निवळे व निशिगंधा पाटीलने संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिजच्या श्‍लोका पाटील व प्रगती त्रिजनीवर ६-०ने मात केली. डॉ. डी. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनच्या मैत्रेयी इंगळे व समीक्षा पाटीलने घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या तन्वी मुंदडा व अक्षिता नसिंघाणीवर ६-४ गुणफरकाने बाजी मारली. हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूलच्या भाग्यश्री हुक्केरी व आकांक्षा लांडेला प्रतिस्पर्धी न आल्याने पुढे चाल मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या