Schoolympics 2019 : ओम, अमन, अश्‍विन,  श्रीशैल उपांत्य फेरीत 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) नंदन गायकवाड व चैतन्य ठाणेदारने संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या ऋषी ब्रह्मभट व सूरज चौधरीचा ६-० ने पराभव केला.

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या दुहेरी टेनिस स्पर्धेत ओम बुरगे व अमन तुकारिया, अश्‍विन नरसिंघाणी व श्रीशैल शिरहट्टी, नंदन गायकवाड व चैतन्य ठाणेदारने उपांत्य फेरीत आज प्रवेश केला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या (सीबीएसई) ओम बुरगे व अमन तुकारियाने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्याच अर्णव जैन व मानव लाहोटीवर ६-१, तर छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) अश्‍विन नरसिंघाणी व श्रीशैल शिरहट्टीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विवान भोकरे व ऋषी परिखला ६-०ने हरविले. छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) नंदन गायकवाड व चैतन्य ठाणेदारने संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या ऋषी ब्रह्मभट व सूरज चौधरीचा ६-० ने पराभव केला.


​ ​

संबंधित बातम्या