Schoolympics 2019 - वेदांत, अथर्व, सुजलने पटकाविले सुवर्णपदक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. केएसएच्या टेबल-टेनिस हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन 
करण्यात आले.

कोल्हापूर - बारा वर्षांखालील मुलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत वेदांत पाटील, चौदा वर्षांखालील अथर्व पाटील, तर सोळा वर्षांखालील गटात सुजल सुतारने सुवर्णपदक पटकाविले. दुहेरीत चौदा वर्षांखालील गटात प्रणव चोन्नद व रणवीर हजारी, तर सोळा वर्षांखालील गटात अनिकेत चोपडे व प्रणव शेलारने बाजी मारली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. केएसएच्या टेबल-टेनिस हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन 
करण्यात आले. 

निकाल असा : एकेरी - १२ वर्षांखालील - वेदांत पाटील (प्रायव्हेट) वि. वि. सोहम चव्हाण (विमला गोएंका) (९-११, ११-५, ११-८), पिनाक पाटकर (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी) वि. वि. सार्थक चव्हाण (विमला गोएंका) (११-६, ११-६, ११-५). १४ वर्षांखालील - अथर्व पाटील (विमल गोएंका) वि. वि. प्रमोद शिंदे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज) (७-११, ११-८, ११-६, ११-९), सुमेध पोरे (सेंट झेवियर्स) वि. वि. पार्थ फडतारे (विमला गोएंका) (१२-१०, ११-८, ९-११, ६-११, ११-९). १६ वर्षांखालील - सुजल सुतार (छत्रपती शाहू, एसएससी) वि. वि. अनिकेत चोपडे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज) (११-४, ११-९, ११-७), अखिलेश टिंगरे (प्रायव्हेट) वि. वि. चिंतन संकपाळ (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज) (११-५, ११-८, ११-३). दुहेरी - १४ वर्षांखालील - प्रणव चोन्नद व रणवीर हजारी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. पियूष कमलाकर व संस्कार पवार (विद्यापीठ) (११-७, ८-११, ११-९, ११-१२, १२-१०). संस्कार पाटील व प्रमोद शिंदे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज). १६ वर्षांखालील - अनिकेत चोपडे व प्रणव शेलार (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज) वि. वि. जय हजारी व पार्थ सणगर (संजय घोडावत सीबीएसई) (११-५, ११-६, ११-२०), आर्यन देसाई व अखिलेश टिंगरे (प्रायव्हेट).


​ ​

संबंधित बातम्या