Schoolympics 2019 : बजाज, बेंगानीचे विजय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

कोल्हापूर - मुलांच्या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सर्वेश जोडकर व शंतनू मांडरे, १४ वर्षांखालील सुप्रीत हलगली व जयप्रकाश जकोट्या, कुणाल डांबल व आदित्य जाधव, सिद्धार्थ खटाव व पार्थ रंदारने प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. १६ वर्षांखालील गटात अथर्व कदम व प्रथमेश मोरे, मोहित भोसले व देवांश पाटील, तर आयुष बजाज व अरहम बेंगानीने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत ही स्पर्धा सुरू आहे.

निकाल असा : १२ वर्षांखालील- सर्वेश जोडकर व शंतून मांडरे (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. हर्षल जाधव व निषाद सावडी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), अर्णव जाधव व आदित्य सावडी (डीकेटीई इंग्लिश मीडियम स्कूल), गौरव चौगुले व समरजित इंगळे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) पुढे चाल.

 १४ वर्षांखालील- सुप्रीत हलगली व जयप्रकाश जकोट्या (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. अस्मित चव्हाण व प्रणव माळी (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल), कुणाल डांबल व आदित्य जाधव (अल्फान्सो स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय) वि. वि. आदित्य कागे व तनय पाध्ये (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), सिद्धार्थ खटाव व पार्थ रंदार (अल्फान्सो स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय) वि. वि. हुजेफा मोमीन व श्रीपद्म मुनीसवार (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी), रिषी हमलाय व सोहम देशपांडे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. आयुष देवस्थळी व आदित्य शेटे (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम)

 १६ वर्षांखालील- अथर्व कदम व प्रथमेश मोरे (सेंट झेवियर्स हायस्कूल) वि. वि. आर्यन रुईकर व सुजल सोलापूर (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट), मोहित भोसले व देवांश पाटील (कोल्हापूर पब्लिक स्कूल) वि. वि. आर्यन माने व व्यंकटेश उंडाळे (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम), आयुष बजाज व अरहम बेंगानी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. वरद कावडे व सार्थ पाटील (चाटे स्कूल).

​ ​

संबंधित बातम्या