Schoolympics 2019 : नरके, संजीवनची  अंतिम फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर - मुलांच्या हॉकी स्पर्धेत डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय आणि संजीवन पब्लिक स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत अंतिम फेरीत आज प्रवेश केला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात डी. सी. नरके विद्यानिकेतनने एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाला ४-०ने पराभूत केले. त्यांच्या गुरुनाथ कारंडेने ११, प्रथमेश शियेकर २३, यशराज पाटील २५, तर हर्षवर्धन पाटीलने ३४ व्या मिनिटाला गोल केला. दुसऱ्या सामन्यात संजीवन पब्लिक स्कूलने दत्ताबाळ हायस्कूलविरुद्धच्या सामन्यात बाजी मारली. संजीवनने दत्ताबाळ हायस्कूलचा २-०ने पराभव केला. त्यांच्या अथर्व पाटीलने २६ व नितीन शिंदेने ३२ व्या मिनिटाला गोल केला.


​ ​

संबंधित बातम्या