Schoolympics 2019 : नूलच्या न्यू इंग्लिश स्कूलला जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

कोल्हापूर - मुलींच्या हॉकी स्पर्धेत नूल (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने हसूर दुमालाच्या भाई सी. बी. पाटील विद्यालयावर १-० ने मात करीत विजेतेपद पटकावले. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू आहे.

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विरुद्ध भाई सी. बी. पाटील विद्यालय यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांतील खेळाडूंना गोल करता आला नाही. उत्तरार्धात न्यू इंग्लिशकडून कृष्णा मानेने २२ व्या मिनिटाला गोल केला. त्याची परतफेड सी. बी. पाटील विद्यालयाला करता आली नाही. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात बळवंतराव यादव हायस्कूलने विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-० ने मात केली. त्यांच्या श्रेया माहिंदने १२, दिया मुचंडीकर २४, तर अपूर्वा शिंदेने ३६ व्या मिनिटाला गोल केला.

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विजेता संघ असा : सरिता अरबोळे, लताताई भदरगे, माधुरी भोसले, अनुदी चव्हाण, नेत्रा चव्हाण, मनीषा देसाई, लीना घेवडे, सौम्या कादलगे, श्रेया कुराडे, ऋतुजा महाडिक, कृष्णा माने, सानिका माने, स्वप्नाली माने, महानंदा मास्तोळी, समीक्षा शेगुणाशी, दीक्षा स्वामी, वैष्णवी थोरात, वासंती वडगोळ.

​ ​

संबंधित बातम्या