Schoolympics 2019 : कुस्तीत राजनंदिनी, श्रावणी, वैष्णवीला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत कुस्ती स्पर्धा येथे झाली. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन केले होते. 

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलींच्या कुस्ती स्पर्धेत राजनंदिनी इंगवले, श्रावणी येवाळे, वैष्णवी पाटील, अनुराधा अहिरेकर, अर्चना झोरे, साक्षी खापणे, वेदिका सासने व संस्कृती पाटील यांनी वजन गटात सुवर्णपदक पटकावले. शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत कुस्ती स्पर्धा येथे झाली. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन केले होते. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

३९ किलो- राजनंदिनी इंगवले (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी प्रशाला, शिंगणापूर), स्नेहा जोग (नागेश्‍वर हायस्कूल), सुरेखा पाटील (नेहरू विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय). ४२ किलो- श्रावणी येवाळे (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी प्रशाला, शिंगणापूर), साक्षी मगदूम (नेहरू विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय), मधुरा कागवाडे (विद्यामंदिर). ५० किलो- अनुराधा अहिरेकर (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी प्रशाला, शिंगणापूर), सोनाली पाटील (न्यू इंग्लिश स्कूल), पूजा लाड (नागेश्‍वर हायस्कूल). ५४ किलो- अर्चना झोरे (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी प्रशाला, शिंगणापूर), श्रद्धा कुंभार (उषाराजे हायस्कूल). ५८ किलो- साक्षी खापणे (उषाराजे हायस्कूल), मधुरा चौगले (नेहरू विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय). ६२ किलो- वेदिका सासने (विमला गोएंका इंग्लिश मीडियम), दिशा डोंगरे (सेंट झेवियर्स हायस्कूल). ६६ किलो- संस्कृती पाटील (नेहरू विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय), भाग्यश्री कांबळे (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी प्रशाला, शिंगणापूर).


​ ​

संबंधित बातम्या