Schoolympics 2019 : कुस्तीत श्रेयस, पार्थ, धनराज, गौरवला सुवर्णपदक 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत कुस्ती स्पर्धा झाली. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन 
करण्यात आले. 

कोल्हापूर - बारा वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेत श्रेयस बोडके, पार्थ चौगले, धनराज जामनिक, गौरव पाटील यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत कुस्ती स्पर्धा झाली. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन 
करण्यात आले. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

२५ किलो- श्रेयस बोडके (नागेश्‍वर हायस्कूल), श्रेयश बाऊचिकर (विद्यामंदिर), अवधूत खोत (श्रीराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), प्रणव भोसले (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल). २८ किलो - पार्थ चौगले (विद्यामंदिर), राजवर्धन पाटील (सेंट्रल स्कूल), शिवानंद मगदूम (सिद्धनेर्ली विद्यालय), ओमकार जाधव (दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय). ३० किलो - धनराज जामनिक (देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल), सूरज हुजरे (श्रीराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), अथर्व चौगुले (देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल), शुभम रानगे (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी प्रशाला, शिंगणापूर). ३२ किलो - गौरव पाटील (पॅरामाऊंट इंग्लिश मीडियम स्कूल), रवी गोसावी (देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल), सोहम कुंभार (विद्यामंदिर), सर्वेश कांबळे (जिनियस इंग्लिश मीडियम स्कूल).


​ ​

संबंधित बातम्या