81व्या वर्षी गोविंदकाका करणार सांगली ते एव्हरेस्ट पायथा सायकल मोहिम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 April 2019

गोविंदकाका परांजपे...वय 81 वर्षे परंतू उत्साह 18
वर्षाचा...शेकडो किलोमीटरच्या सायकल मोहिम सहज पार करणारे काका आज तब्बल 2100 किलोमीटरच्या सायकल मोहिमेला रवाना झाले.

सांगली : गोविंदकाका परांजपे...वय 81 वर्षे परंतू उत्साह 18
वर्षांचा...शेकडो किलोमीटरच्या सायकल मोहिम सहज पार करणारे काका आज तब्बल 2100 किलोमीटरच्या सायकल मोहिमेला रवाना झाले. "सी टू स्काय' या मोहिमेसाठी ते सांगलीतून मुंबईत "गेट वे ऑफ इंडिया' गाठतील. त्यानंतर मुंबई ते नेपाळमधील एव्हरेस्ट पायथ्याजवळील पोखरा येथे 1 मे ते 5 जूनपर्यंत सायकलप्रवास करतील. माधवनगरच्या गोविंदकाकांनी आजपर्यंत अनेक सायकल सफरी पूर्ण केल्या आहेत.

हजार किलोमीटरच्या कितीतरी मोहिमा फत्ते केल्याचा अनुभव पाठीशी आहे.
परंतू "सी टू स्काय' ही 2100 किलोमीटरची मोहिम 81 व्या वर्षी पूर्ण
करण्याचा मानस त्यांनी ज्यावेळी बोलून दाखवला, तेव्हा सहकाऱ्यांनी या
वयात आणि अशा तापमानात कशाला धाडस करता? असे विचारले. परंतू काकांनी आपण ही मोहिम फत्ते करणारच असा दृढ निश्‍चय बोलून दाखवला. तेव्हा सहकारी मंडळींचा नाईलाज झाला. त्यांनी काकांच्या इच्छेला होकार दिला. आज सकाळी वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्या "आभाळमाया' फाऊंडेशनच्या कार्यालयासमोर काकांना शुभेच्छा देण्यासाठी सायकलप्रेमी मंडळी जमली होती.

ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते. काकांचा उत्साह 18
वर्षाच्या तरूणाला लाजवेल असाच होता. श्री. चौगुले, प्रा. एम.एस. राजपूत,
डॉ. नितीन नायक, व्ही.एम. मराठे, राजा जोशी, श्री. आपटे, वर्धमान पाटील,
डॉ. सुहास जोशी, मनिष जैन आदी मंडळींनी काकांचा उत्साह वाढवत शुभेच्छा
दिल्या.

दरम्यान काका आज सकाळी कराडमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. 30
एप्रिलला ते मुंबईत पोहोचतील. त्यानंतर एक मे रोजी "सी टू स्काय' ही
मोहिम सुरू होईल. मुंबईतून नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, अमरावती, नागपूर,
जबलपर, प्रयागराज, गोरखपूरनंतर नेपाळ हद्दीत बालतुंग, बाडखोलामार्गे
एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या पोखरापर्यंत ते 5 जून रोजी पोहोचतील.
तेथे त्यांचे स्वागत होईल.

41 अंश तापमानात मोहिम-
-पारा 41 अंशावर पोहोचला आहे. अशा वातावरणात सकाळी आणि सायंकाळी दोन
-टप्प्यात 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास ते करतील. भारत व नेपाळमधील ज्येष्ठ
-नागरिक संघ आणि आभाळमाया फाऊंडेशन त्यांच्या मदतीसाठी तत्पर असेल.


​ ​

संबंधित बातम्या