मिसेस सर्फराज म्हणाल्या ः धोनीचे वय किती? तो झालाय का रिटायर?

वृत्तसंस्था
Sunday, 20 October 2019

इस्लामाबाद ः पाकिस्तानच्या कसोटी आणि टी20 कर्णधारपदावरून हकालपट्टी झालेल्या सर्फराज अहमद याने रिटायर व्हावे अशी मागणी करणाऱ्या टीकाकारांना त्याची पत्नी खुशबख्त यांनी फैलावर घेतले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सर्फराजला दोन्ही संघांमधून वगळण्यात आले आहे. 32 वय असलेल्या सर्फराजच्या फॉर्म आणि फिटनेसवरही टीका होत आहे. वर्ल्ड कपपासूनच तो टीकाकारांचे लक्ष्य बनला आहे.

या पार्श्वभूमीवर खुशबख्त यांनी सारी टीका फेटाळून लावली. त्यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे उदाहरण दिले. त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. त्या म्हणाल्या की, सर्फराजने का रिटायर व्हावे ? तो फक्त 32 वर्षांचा आहे. धोनीचे वय किती आहे ? सध्याच्या वयाला तो झाले आहे का निवृत्त ?

कर्णधारपद जाणार हे आम्हाला तीन दिवसांपूर्वीच माहित होते, असा दावाही खुशबख्त यांनी केला. सर्फराज पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या की, सर्फराज लढवय्या आहे. नेतृत्व गेले म्हणजे त्याच्यासाठी मार्ग बंद झालेला नाही. आता तो दडपणाशिवाय खेळू शकेल.

​ ​

संबंधित बातम्या