अडथळ्यावर मात करीत 13 वर्षांचा सार्थक वेगावर स्वार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

सरावासाठी योग्य धावपट्टी उपलब्ध नसतानाहि अनेक अडथळ्यावर मात करीत 13 वर्षीय शालेय विद्यार्थी, सार्थक चव्हाण दुचाकीवर चित्तथरारक कवायतीचा थरारा दाखवत वेगावर स्वार होत आहे.

पुणे : सरावासाठी योग्य धावपट्टी उपलब्ध नसतानाहि अनेक अडथळ्यावर मात करीत 13 वर्षीय शालेय विद्यार्थी, सार्थक चव्हाण दुचाकीवर चित्तथरारक कवायतीचा थरारा दाखवत वेगावर स्वार होत आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच दुचाकी चालवण्याचा सराव करणारा सार्थक आठव्या वर्षापासून विविध दुचाकी स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली दुचाकीवरील हुकमत सिध्द करत आला आहे. 

Image may contain: 1 person, smiling

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आपल्या यशाचा ठसा उमटवणाऱ्या या भारतीय बालचमू खेळाडुची दखल घेत होंडा मोटार कंपनीने त्याला नेतृत्वाची संधी दिली आहे. कंपनीने सार्थक याला फिलिपिन्स येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिले होते. या स्पर्धेत तो जागतीक क्रमवारीत आठवा ठरला असून, पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये त्याचा समावेश झाला आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी अमेरिकेतील अटलांटा येथे मिलसॅफ ट्रेनिंग फॅसिलीटीमध्ये 50 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर 11व्या वर्षी दुबईतील मोटोक्रॉस स्पर्धेत तो विजयी झाला होता. तसेच वयाच्या 12 व्या वर्षी भारताचा तो नॅशनल चॅम्पियन झाला होता.

Image may contain: 1 person, smiling, motorcycle and outdoor


​ ​

संबंधित बातम्या