Wimbledon 2019 : सेरेनाला सराव पडला महागात; झाला दणदणीत दंड!

वृत्तसेवा
Tuesday, 9 July 2019

अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला विंबल्डन कोर्टचे नुकसान केल्याबद्दल दहा हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑल इंग्लंड क्लबने ही कारवाई केली.

लंडन : अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला विंबल्डन कोर्टचे नुकसान केल्याबद्दल दहा हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑल इंग्लंड क्लबने ही कारवाई केली.

हा प्रकार स्पर्धेपूर्वी सराव सत्रादरम्यान घडला. सेरेनाने रॅकेटचा वापर करून कोर्टचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले.

सेरेनाची मंगळवारी देशभगिनी अॅलिसन रिस्कशी लढत होत आहे. सेरेनाने याविषयी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, तसेच तिचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीनेही काही भाष्य केलेले नाही.


​ ​

संबंधित बातम्या