World Cup 2019 : चोकर्स नव्हे हे तर पॅकर्स

शैलेश नागवेकर
Thursday, 20 June 2019

साखळी सामन्यांत दिमाखदार कामगिरी करायची आणि निर्णायक सामन्यात अवसानघात करून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरायचे याला चोकर्स म्हणतात,  क्रिकेट विश्वाात हा शब्द दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सर्सासपणे वापरला जातो पण आता त्यांना कदाचीत पॅकर्स म्हणूनही ओखळले जाईल.

वर्ल्ड कप 2019 : साखळी सामन्यांत दिमाखदार कामगिरी करायची आणि निर्णायक सामन्यात अवसानघात करून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरायचे याला चोकर्स म्हणतात,  क्रिकेट विश्वाात हा शब्द दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सर्सासपणे वापरला जातो पण आता त्यांना कदाचीत पॅकर्स म्हणूनही ओखळले जाईल.

यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत त्यांचे आव्हान तांत्रिकदृष्ट्या संपले आहे. सहापैकी अवघा एक विजय !!  ही फारच मोठी अधोगती आहे. 1992 च्या स्पर्धेत त्यांना प्रथमच विश्वकरंडक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली त्या स्पर्धेनंतर गतस्पर्धेपर्यंत सात स्पर्धा झाल्या त्यापैकी चार स्पर्धांत दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली होती. म्हणजेच गटसाखळीत किंवा सुपर सिक्स मध्ये त्यांची कामगिरी दिमाखदारच होती, पण यंदा सहापैकी एकच विजय तोही दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध ! असा दक्षिण आफ्रिकेचा संघ कधीच नव्हता. 

वंशभेद केल्यामुळे बष्हिकृत झालेल्या या देशाला 1992 मध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. तेव्हा हा संघ क्रिकेट विश्वासाठी नवखा होता. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केलेल्या केपलर वेलल्स यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या आगमनाची वर्दी दिली होती. देशाला आंतरराष्ट्रीय बंद असली तरी दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट सुरु होते. त्यांचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत होते त्यामुळे अनुभवात कमी नव्हते. त्यामुळे 1992 च्या स्पर्धेत जोरदार एण्ट्री झाली. उपांत्य सामन्यात पावसाने घात केला तेव्हापासून ते आत्तापर्यंत चोकर्सचे शुल्ककाष्ट त्यांच्या मागे लागलेले आहे आता तर उबंरठाही त्यांना पार करणे कठिण झाले. 

सर्वश्रेष्ठ खेळाडूंची कमी नव्हती

दक्षिण आफ्रिकेला एकापेक्षा एक खेळाडूंची कमी कधीच जाणवली नाही. पुनरगामनचे कर्णधार  स्वतः वेलल्स, हॅन्सी क्रोनिए, अॅलेन डोनाल्ड, ब्रायन मॅकमिलन, जॉन्ही ऱ्होडस् डेव्हिड रिचर्डसन (आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष) गॅरी कर्स्टन, शॉन पोलॉक, निल मॅकन्झी, जॅकस् कॅलिस, मार्क बाऊचर, ग्रॅहम स्मिथ, एबी डिव्हिल्यर्स, डेल स्टेन असे सर्वश्रेष्ठ खेळाडू त्या त्या पिढीत तयार झाले काही एकत्रही खेळले, परंतु विजेतेपदाची भट्टी त्यांना जुळवता आली नाही. आत्ताच्या संघावर नजर टाकली तर नावाजलेला किंबहूना मॅचविनर असा एकही खेळाडू दिसत नाही त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणालयला हरकत नाही.

यंदाच्या अपयशाची नेमकी कोणती कारणे आहेत ते पाहुया :

सुमार क्षेत्ररक्षण

दक्षिण आफ्रिका आणि चपळ क्षेत्ररक्षण हे समिकरण 1992 च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर तयार झाले. आठवतोय ना, जॉन्टी ऱ्होडसने पाकिस्तानचा इंझमाम उल हकला हवेत सूर मारून केलेले रनआऊट ! असे म्हणतात की दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू हे आईच्या पोटातून क्षेत्ररक्षण शिकून येतात. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांचे क्षेत्ररक्षण पाहिले तर ऱ्होडसने डोके आपटले असेल. डेव्हिड मिलर भविष्यात कर्णधार होणाची क्षमता असलेला हा खेळाडू पण त्याने न्यूझीलंडचा विजय साकार करणाऱ्या केन विलियमसन आणि ग्रॅडहोम यांचे प्रतेकी दोन झेल तरी सोडले आणि दक्षिण आफ्रिकेला हा सामना अखेरच्या षटकात गमावावा लागला. धावचीत करण्याचीही संधी गमावली. पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावला त्यातही आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण सर्वसामान्यच होते.

कोटा पद्धत

वर्णद्वेषच्या  बंदीनंतर त्यांनी पुनरागमन केले असले तरी त्यांना अंतिम संघात सहाच श्र्वेत वर्षीय आणि तीन कृष्णवर्षीय खेळाडू खेळाडू बंधनकारक आहे. पण कृष्णवर्षीय खेळाडूही काही कमी नाही. कागिसो रबाडा हा तर विश्वविख्यात वेगवान गोलंदाज आहेच. त्याने कृष्णवर्षीय म्हणून संघात स्थान मिळवलेले नाही. क्विन्टॉन डिकॉक, फार डुप्लेसी, डेव्हिड मिलर या विख्यात खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला हा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो. याच डिकॉक, डुप्लेसी यांनी एका भारत दौऱ्यात मुंबईत झालेल्या अखेरच्या सामन्यात शतके करून चारशे धावा उभारल्या होत्या. 

दक्षिण आफ्रीका संघातील कागिसो रबाडा हा कृष्णवर्षीय खेळाडू असला तरी त्याने वर्णाच्या जोरावर संघात स्थान मिळवलेले नाही. रंगाच्या जोरावर संघात स्थान द्यायला हवे याला माझा विरोध आहे. सर्वांना संधी मिळायला हवी. व्यावसाईक स्थरावर खेळाडू त्यांच्या गुणवत्तेनुसार निवडले  जातात, अशी कोटा पद्धत अन्यायकारक आहे. कोणी संधी दिली यापेक्षा ती क्षमता सिद्ध करून मिळायला हवी .

- कागिसो रबाडा

निवृत्ती आणि दुखापत

या स्पर्धेत उतरण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला अपशकून झाला हे खरे. त्यांचे प्रमुख अस्त्र डेल स्टेन पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे स्पर्धेतून बाहेर गेला. त्यातच थ्री डीग्री क्षमता असलेला एबी डिव्हिल्यर्स अगोदरच निवृत्त झाला होता. वास्तविक दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या पराभवानंकर त्याने निवृत्ती मागे घेऊन खेळण्याची इच्छा दाखवली होती, पण त्यांच्या मंडळाने इगो दाखवला आणि तुझी आता गरज नसल्याचे सांगितले. एबीला खेळवले असते तर...? हा प्रश्न दक्षिण आफ्रिका मंडळाला राहून राहून वाटत असेल.


​ ​

संबंधित बातम्या