World Cup 2019 : बहारदार शकिब; युवराजच्या विक्रमाशी बरोबरी
अफगाणिस्तानविरुद्ध आज त्याने अर्धशतकी खेळी आणि पाच बळी अशी दुहेरी कामगिरी केली. विश्वकरंडक स्पर्धेतील ही आजपर्यंतची सर्वोत्तम ठरली. यापूर्वी 2011 मध्ये युवराजसिंगने आयर्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
वर्ल्ड कप 2019 : या स्पर्धेत बांगलादेश संघाचा शकिब अल हसन जबरदस्त कामगिरी करतोयं. धावांबरोबर बळी देखील मिळवत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध आज त्याने अर्धशतकी खेळी आणि पाच बळी अशी दुहेरी कामगिरी केली. विश्वकरंडक स्पर्धेतील ही आजपर्यंतची सर्वोत्तम ठरली. यापूर्वी 2011 मध्ये युवराजसिंगने आयर्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
युवराजची कामगिरी : 50 धावा, 75 चेंडू, 3 चौकार
गोलंदाजी पृथ्थकरण : 10-1-31-5
शकिबने आजच 35वी धाव घेताना विश्वकरंडक स्पर्धेतील एक हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातील तो 19वा, तर बांगलादेशाचा पहिलाच फलंदाज ठरला.
The man of the moment!#BANvAFG | #RiseOfTheTigers | #CWC19 pic.twitter.com/NozCozxhZE
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 24, 2019