World Cup 2019: शिखर धवनचे अर्धशतक, भारताची दमदार सुरुवात

वृत्तसंस्था
Sunday, 9 June 2019

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी खेळताना वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार सुरवात केली असून सलामीवीर शिखर धवनने अर्धशतक केले आहे. तसेच धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिखर धवनच्या 9000 धावाही पूर्ण केल्या आहेत.

वर्ल्ड कप 2019
ओव्हल: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी खेळताना वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार सुरवात केली असून सलामीवीर शिखर धवनने अर्धशतक केले आहे.

हिटमॅन रोहितचा कॅच सोडणं ऑस्ट्रेलियाला महागात पडणार?

53 चेंडूचा सामना करताना त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील 28वे अर्धशतक साजरे केले. तसेच धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिखर धवनच्या 9000 धावाही पूर्ण केल्या आहेत.

हिटमॅन रोहित शर्माचा दुसऱ्या षटकात नॅथन कोल्टर नायलने झेल सोडला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याने हा कॅच सोडल्यानंतर रोहित आणि शिखरची जोडी चांगलीच जमली असून त्यांनी शतकी भागीदारीही केली आहे. रोहित शर्माने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना चांगली फलंदाजी केलेली असल्याने हा कॅच ऑस्ट्रेलियाला महागातही पडू शकतो.


​ ​

संबंधित बातम्या