World Cup 2019 : शिखर धवन जखमी; अंगठ्याचे होणार स्कॅनिंग

वृत्तसंस्था
Tuesday, 11 June 2019

भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याच्या डाव्या अंगठ्याची दुखापत अजून बरी झालेली नाही. त्याच्या अंगठ्यावर अजूनही सूज कायम आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याच्या डाव्या अंगठ्याची दुखापत अजून बरी झालेली नाही. त्याच्या अंगठ्यावर अजूनही सूज कायम आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाथन कोल्टर नाईलचा एक उसळता चेंडू त्याच्या अंगठ्यावर आदळला होता. त्याला वेदना होत होत्या. मात्र, शिखर धवनने वेदन सहन करतच शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीनंतर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. 

त्याच्या अंगठ्यावरील सूज अजून कायम असल्यामुळे काळजीसाठी भारतीय संघाचे फिजियो पॅट्रिक फरहात यांनी स्कॅनिंग करण्याचा निर्मय घेतला आहे. भारताचा पुढील सामना गुरुवारी (ता. 13) न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्‍चर असू नये, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापन व्यक्त करत आहे. सध्या तरी धवन अंगठा बांधूनच वावरत आहे.


​ ​

संबंधित बातम्या