World Cup 2019 : गब्बरची जिगरच जबर : दुखापत नाही, ही तर उसळी घेण्याची संधी!
टिम इंडियाचा डावखुरा जिगरबाज सलामीवीर शिखर धवन याने डाव्या हाताच्या अंगठ्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले असले तरी जिमची वाट धरली आहे. तो तंदुरुस्ती आणि चपळाईसाठी शरीराच्या खालील भागाचा व्यायाम करीत आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
वर्ल्ड कप 2019 : लंडन : टिम इंडियाचा डावखुरा जिगरबाज सलामीवीर शिखर धवन याने डाव्या हाताच्या अंगठ्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले असले तरी जिमची वाट धरली आहे. तो तंदुरुस्ती आणि चपळाईसाठी शरीराच्या खालील भागाचा व्यायाम करीत आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने सकारात्मक भावना सुद्धा व्यक्त केली आहे. "दुखापती होतात तेव्हा तुम्ही दुःस्वप्न पाहू शकता किंवा जिद्दीने उसळी घेण्याची संधी अशीही दृष्टी ठेवू शकता. मी बरा होण्यासाठी तुम्हा सर्वांनी पाठविलेल्या शुभेच्छा आणि सदिच्छांबद्दल आभारी आहे,' असे त्याने म्हटले आहे.
31 वर्षांच्या धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीदरम्यान वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याचा चेंडू लागला. तो पुढील तीन सामने खेळू शकणार नाही, पण इंग्लंडविरुद्ध 30 जून रोजी बर्मिंगहॅमला होणाऱ्या महत्त्वाच्या लढतीपर्यंत तो सज्ज होण्याची आशा संघव्यवस्थापन बाळगून आहे. गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. त्यापूर्वी सुद्धा धवनने मैदानावर उतरून धावण्याचा सराव केला होता. त्याने एका हाताने काही झेल घेण्याचाही सराव केला. 31 वर्षीय धवनच्या दुखापतीची तपासणी आणि आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येईल.
You can make these situations your nightmare or use it an opportunity to bounce back.
Thank you for all the recovery messages from everyone. pic.twitter.com/mo86BMQdDA— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 14, 2019