World Cup 2019 : पाकिस्तान संघ त्यांच्या कर्माने हरला : अख्तर
-हसन अली अजूनही टी 20मध्ये रमलेला गोलंदाज.
-विश्वकरंडक खेळताना तो चेंडूला वेग देऊ शकला नाही, चेंडू स्विंगही करू शकला नाही
-संघ व्यवस्थापन मूर्ख आहे. संघच्या घडणी आणि बांधणीसाठी ते काही करत नाहीत
-इम्रान खान यांनी पाकिस्तानी संघाला पाठिशी घालू नये. उलट ज्यांच्यात क्षमता आहे, अशा खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे
वर्ल्ड कप 2019 : कराची : भारताविरुद्ध आणि तो देखील विश्वकरंडक स्पर्धेत आणखी एक पराभव पत्करावा लागल्यावर पाकिस्तान संघावर टिका होणार हे नवे नाही. या वेळी सर्वात प्रथम माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने तोफ डागली आहे. त्याने पाकिस्तानी संघ त्यांच्या कर्माने हरला अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ज्या चुका केल्या, त्याच चुका या वेळी पाकिस्तानी संघाकडून झाल्या. ते त्यांच्या कर्माने हरले, असे तो म्हणाला.
Watch the full video on my youtube channel: https://t.co/WAieJRdY0o pic.twitter.com/dy9ZMJUFH2
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 16, 2019
त्याने कर्णधार सर्फराज अहमद यालाही लक्ष्य केले आहे. तो म्हणाला, "सर्फराजचे नेतृत्व कल्पनाशून्य होते. नोणेफेक जिंकून त्याने प्रथम गोलंदाजी घेतली ही सर्वांत मोठी पहिली चूक झाली. त्यानंतर भारताविरुद्ध दोन फिरकी गोलंदाज खेळवून त्यांचा उपयोग देखील नीट करता आला नाही. दुसऱ्या डावात पावसाची शक्यता असताना आणि आव्हानाचा पाठलाग करणे जमत नाही हे माहित असून ही त्याने असा निर्णयका घेतला हे कळाले नाही.''
अख्तरची अशीही टिका...