क्षुद्र चर्चेत कुटुंबीयांना ओढू नका : शोएब 

वृत्तसंस्था
Tuesday, 18 June 2019

पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांच्या विश्‍वासार्हतेचे उत्तरदायित्व आमचे न्यायालय केव्हा तपासणार? गेल्या 20 वर्षांहून जास्त काळ मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझ्यादेशाचे प्रतिनिधित्व करतो आहे. अशावेळी खासगी आयुष्याबद्दल खुलासा करावा लागणे खेदजनक आहे. संबंधित व्हिडिओ 15 नव्हे, तर 13 जूनचा आहे. 
- शोएब मलिक, पाक क्रिकेटपटू 

लंडन : भारताविरुद्धच्या पराभवाचे पडसाद पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अजूनही उमटत आहेत. भारतीय टेनिसपटू पत्नी सानिया मिर्झा हिच्यासह शीशा प्लेसमध्ये पार्टी करतानाचे आणि हुक्का पीतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावरून होत असलेल्या टीकेला शोएबने प्रत्युत्तर दिले. असल्या क्षुद्र चर्चेत कुटुंबीयांना ओढू नये, अशी विनंती त्याने केली. 

शोएब सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. सामन्याआधी कर्णधार सर्फराज अहमद आणि प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी त्याला पाठिंबा दिला होता, पण त्याने अपेक्षाभंग केला. वादाच्या पार्श्वभूमीवर तो म्हणाला की, "सर्व खेळाडूंच्या वतीने मी प्रसार माध्यमे आणि लोकांना विनंती करतो आहे. आमच्या कुटुंबीयांच्या बाबतीत योग्य तो आदर दाखवा. तुमच्या मनाप्रमाणे त्यांना क्षुद्र चर्चेत ओढू नका. असे करणे काही चांगले नाही.' 
शोएबसाठी भारताविरुद्धचा सामना कारकिर्दीतील शेवटचा ठरला असल्याचा निष्कर्ष अनेक माजी कसोटीपटू आणि तज्ञांनी काढला आहे. यापुढे त्याला संधी मिळता कामा नये, असे संतप्त क्रिकेटप्रेमी म्हणत आहेत. 

पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांच्या विश्‍वासार्हतेचे उत्तरदायित्व आमचे न्यायालय केव्हा तपासणार? गेल्या 20 वर्षांहून जास्त काळ मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझ्यादेशाचे प्रतिनिधित्व करतो आहे. अशावेळी खासगी आयुष्याबद्दल खुलासा करावा लागणे खेदजनक आहे. संबंधित व्हिडिओ 15 नव्हे, तर 13 जूनचा आहे. 
- शोएब मलिक, पाक क्रिकेटपटू 

​ ​

संबंधित बातम्या