Wimbledon 2019 :सनसनाटी सिमोनाची सेरेनाविरुद्ध सरशी
सनसनाटी सिमोना
- सेरेनावर कारकिर्दीत दुसराच विजय
- यापूर्वी दहा लढतींत नऊ वेळा हार
- आधीचा एकमेव विजय सिंगापूरमधील 2014च्या डब्ल्यूटीए फायनलमध्ये 6-0, 6-2
- ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत सेरेना चार लढतींत प्रथमच पराभूत
- विंबल्डनमध्ये यापूर्वी 2011च्या दुसऱ्या फेरीत सेरेना 3-6, 6-2, 6-1 अशी विजयी
- सिमोनाचे कारकिर्दीतील दुसरेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद
- यापूर्वी 2018 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये विजेती
विंबल्डन : रुमानियाच्या सिमोना हालेपने विंबल्डनमध्ये महिला एकेरीची नवी विजेती बनण्याचा बहुमान पटकावला. अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला दोन सेटमध्ये चार गेमच्या मोबदल्यातच हरविण्याचा पराक्रम केला.
पहिल्याच गेममध्ये सेरेनाची सर्व्हिस भेदल्यानंतर तिने डबल ब्रेक मिळविला. 4-0 अशा भक्कम आघाडीनंतर तिने सेरेनावर सतत दडपण राखले. तिने केवळ 56 मिनिटांतच सामना जिंकला. या पराभवामुळे सेरेनाची 24व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची आणि पर्यायाने ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची प्रतीक्षा लांबली.
निकाल :
सिमोना हालेप (रुमानिया 7) वि. वि. सेरेना विल्यम्स (अमेरिका 11) 6-2, 6-2.