विश्वकरंडक नेमबाजी : चीनसह सहा देशांची 'कोरोना'मुळे माघार

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

कोरोनाचा जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्यामुळे चीनसह सहा देशांनी नवी दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा 15 ते 26 मार्च दरम्यान डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंजवर होणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्यामुळे चीनसह सहा देशांनी नवी दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा 15 ते 26 मार्च दरम्यान डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंजवर होणार आहे.

INDvsNZ : आधीच फलंदाजीची वाट लागलीये, आता 'हा' जखमी झाला

काही देशांनी स्पर्धेतील सहभाग निश्‍चित केला आहे, पण कोरोनामुळे काही देशांनी आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेस प्राधान्य दिले आहे. चीनने स्वतःहूनच संघ न पाठवण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, अशीच त्यांची इच्छा आहे. तैवान, हॉंगकॉंग, मकाव, उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान यांनी त्यांच्या राष्ट्रीय धोरणानुसार संघ न पाठवण्याचे ठरवले आहे, असे भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले.

पाकिस्तानचे नेमबाज या स्पर्धेत नसतील. गतवर्षीची आणि या वर्षीची सांगड घालू नका. आपले नेमबाज स्पर्धेत नसतील असे पाक संघटनेने आम्हाला कळवले आहे.
- रनिंदर सिंग, भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष

Women's T20 World Cup : विजयाची हॅटट्रीक; भारताची सेमी फायनलमध्ये धडक

पाकिस्ताननेही या स्पर्धेत न खेळण्याचे ठरवले आहे. पाकने आपल्या नेमबाजांसाठी जर्मनीतील मार्गदर्शकांची नियुक्ती केली आहे. त्यांना याच स्पर्धेच्या कालावधीत वेळ आहे. पाक नेमबाजी संघटनेने आपल्या खेळाडूंच्या स्पर्धा सहभागापेक्षा मार्गदर्शनास जास्त पसंती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. गतवर्षी पाक नेमबाजांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा संयोजनावर निर्बंध आले होते.

Women's T20 World Cup : वय 16, पहिला वर्ल्डकप अन् केला 'हा' खतरनाक रेकॉर्ड 

टोकियो चाचणी नेमबाजी स्पर्धेतून माघार?
भारतीय नेमबाजांना मायदेशातच सराव करण्याची सूचना देताना भारतीय नेमबाजी संघटनेने आम्ही टोकियो ऑलिंपिक चाचणी नेमबाजी स्पर्धेतून माघार घेण्याचा पर्याय खुला ठेवला असल्याचे सांगितले. आम्ही या स्पर्धेसाठी संघ निवडला आहे; पण कोरोनाची लागण होण्याची जरा जरी धोका असेल, तर आमचा संघ स्पर्धेसाठी जाणार नाही. यासंदर्भात भारतीय ऑलिंपिक संघटना, जागतिक नेमबाजी संघटना यांचे मत विचारात घेणार आहोत, पण त्याचवेळी आमच्या सूत्रांच्या मतासही पसंती देणार आहोत, असेही रनिंदर सिंग यांनी सांगितले. जपानने यापूर्वीच कोरोनामुळे विविध स्पर्धा तसेच खुले कार्यक्रम किमान दोन आठवडे लांबणीवर टाकण्याचे ठरवले आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या