अखिल भारतीय हॉकी - एसएनबीपी, ऐशबाघ एससी, जय भारत संघांची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

- यजमान एसएनबीपी ऍकॅडमीसह ऐशबाघ स्पोर्टस सेंटर आणि हरियानातील जय भारत हॉकी संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

- ई' गटात त्यांनी  बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ, पश्‍चिम बंगाल संघाचा 4-0 असा पराभव केला

- "क' गटात झालेल्या सामन्यात जय भारत संघाने कर्नालच्या राजा कर्ण ऍकॅडमीचा 4-2 असा पराभव केला.

- ह गटात हॉकी कूर्ग संघाला तांत्रिक आधारावर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला.

पुणे - यजमान एसएनबीपी ऍकॅडमीसह ऐशबाघ स्पोर्टस सेंटर आणि हरियानातील जय भारत हॉकी संघांनी चमकदार विजयासह आपली आगेकूच कायम राखताना येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत ऐशबाग स्पोर्टस सेंटर संघाने सलग दुसरा विजय मिळविला. "ई' गटात त्यांनी बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ, पश्‍चिम बंगाल संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात सौरभ दांडे याने दोन गोल केले. महंमद अनस आणि मोहित कर्मा यांनी एकेक गोल केला.
"क' गटात झालेल्या सामन्यात जय भारत संघाने कर्नालच्या राजा कर्ण ऍकॅडमीचा 4-2 असा पराभव केला. जय भारत संघाकडून अग्यापाल आणि वासु देव यांनी गोल करून पूर्वार्धात संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात नसिब आणि अशोक अजमावत यांनी गोल करून राजा कर्ण संघाला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. मात्र, अखेरच्या टप्प्यात जय भारतच्या खेळाडूंनी खेळ उंचावून विजय मिळविला. या वेळी संदीपने 52 आणि शिवम राणाने 59व्या मिनिटाला गोल केला.
यजमान एसएनबीपी संघाने आज तुफानी आक्रमक खेळ करताना ओटीएचएल इलेव्हान संघाचा 11-1 असा धुव्वा उडविला. "ब' गटातील या सामन्यात एसएनबीपीसाठी रितीक गुप्ता ायने 1, 12, 17 आणि 4÷7व्या मिनिटाला गोल केले. त्याला आकाश यादव यानेही 28, 31, 49 आणि 52व्या मिनिटाला गोल करून सुरेख साथ केली. चंदन यादव याने तीन गोल करून संघाचे गोलाधिक्‍य वाढवले. पराभूत संघाचा एकमात्र गोल सुमीत कुमारने 35व्या मिनिटाला नोंदविला.

निकाल -
ई गट - ऐशबाघ स्पोर्टस सेंटर 4 (महंमद अनस 30वे, मोहित करमा 34वे, सौरभ दांडे 36, 41वे मिनिट) वि.वि. बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ पश्‍चिम बंगाल 0. मध्यंतर 1-0

क गट - जय भारत हॉकी भिवानी, हरियाना 4 (अग्यापाल 27वे, वासु देव 29वे, संदीप 52वे, शिवम राणा 59वे मिनिट) वि. वि. राजा कर्ण ऍकॅडमी, कर्नाल 2 (नसिब 33वे मिनिट, अशोक अजमावत 50वे मिनिट) मध्यंतर 0-0

ब गट - एसएनबीपी ऍकॅडमी 11 (रितिक गुप्ता 1, 12, 17, 47वे, चंदन यादव 5, 19, 25वे, आकाश यादव 28, 31, 49, 52वे मिनिट) वि.वि. ओटीएचएल इलेव्हन, नवी दिल्ली 1 (सुमीत कुमार 35वे मिनिट) मध्यंतर 7-0

ग गट - एसएनबीपी स्कूल 2 (जयदीप घारे 19, 21वे मिनिट) बरोबरी वि. हॉकी नाशिक 2 (साहिल सोंडकर 22वे, निशांत बाविस्कर 56वे मिनिट) मध्यंत 2-1
-----------

हॉकी कूर्गसाठी मैदानी गोल ठरले महत्त्वाचे
ह गटात हॉकी कूर्ग संघाला तांत्रिक आधारावर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला. मुंबई स्कूल स्पोर्टस संघाविरुद्ध त्यांचा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला होता. क्रीडा प्रबोधिनी संघाने स्पर्धेतून माघार घेतल्याने या गटात हा एकमेव सामना झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियम (2/एफ) नुसार गटातील क्रमवारी ही गुणांनुसार लावली जाते. गटात दोन किंवा त्याहून अधिक संघांचे जेव्हा समान गुण होतात, तेव्हा गटातील क्रमवारी संघानी नोंदविलेल्या मैदानी गोलनुसार लावली जाते. या नियमानुसारच हॉकी कूर्गला बाद फेरीत प्रवेश देण्यात आला. हॉकी कूर्ग संघाने मुंबई स्कूलविरुद्धच्या सामन्यात दोन्ही मैदानी गोल केले. मुंबईने एक गोल कॉर्नर, तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला होता. 
---------------
उपांत्यपूर्व फेरी गाठलेले संघ
अ - एमपी हॉकी ऍकॅडमी
ब - एसएनबीपी ऍकॅडमी
क - जय भारत हॉकी भिवानी, हरियाना
ड - सेल हॉकी ऍकॅडमी
ई - ऐशबाग स्पोर्टस सेंटर
फ -
ग - एसजीपीसी अमृतसर
ह - हॉकी कूर्ग


​ ​

संबंधित बातम्या