World Cup 2019 : विराटने इंग्लंडमध्ये घेतला मायभूमीच्या मातीचा गंध

वृत्तसंस्था
Sunday, 9 June 2019

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हायव्होल्टेज ड्रामा सुरु होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीला मायभूमीच्या मातीचा गंध घेण्याची संधी मिळाली.

वर्ल्ड कप 2019
लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हायव्होल्टेज ड्रामा सुरु होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीला मायभूमीच्या मातीचा गंध घेण्याची संधी मिळाली.

स्टार स्पोर्टसने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापूर्वी देशात एक अभियान राबविले होते. या अभियानाद्वारे दिल्ली, रांचीसह अन्य शहरातून माती एकत्र करण्यात आली. एका काचेच्या बॉक्समध्ये गोळा करण्यात आलेली मायभूमीतील माती आज सामन्यापूर्वी विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे सूपूर्त करण्यात आली.

कोहलीकडे ही माती देताच त्याला या मातीचा गंध घेण्याचा मोह आवरला नाही. विराटच्या या कृतीनंतर स्टेडियमवर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. भारताचा विश्वकरंडकात आज दुसरा सामना होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.


​ ​

संबंधित बातम्या