Schoolympics 2019 : जयचे शतक हुकले; एसपीएमचा विजय 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

स्कूलिंपिक्‍स क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी एसपीएम प्रशालेला जय जाधव षटके संपल्यामुळे शतकापासून दोन धावा दूर राहिला. एसपीएमने या सामन्यात विबग्योर प्रशालेचा 91 धावांनी पराभव केला. 

पुणे : स्कूलिंपिक्‍स क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी एसपीएम प्रशालेला जय जाधव षटके संपल्यामुळे शतकापासून दोन धावा दूर राहिला. एसपीएमने या सामन्यात विबग्योर प्रशालेचा 91 धावांनी पराभव केला. 

एनसीएल मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एसपीएम प्रशाला संघाने 10 षटकांत 1 बाद 142 धावांची मजल मारली. यामध्ये जयच्या फटकेबाजीचा मोठा वाटा होता. त्याने 40 चेंडूंत 9 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 98 धावांची खेळी केली. त्याला निनाद पळसुलेने 23 धावा करून सुरेख साथ केली. आव्हानाचा पाठलाग करताना विबग्योरचा डाव 6 बाद 51 असा मर्यादित राहिला. 

विधी महाविद्यालयाच्या मैदानावरील सामन्यात नाबीर शेखच्या नाबाद 64 धावांच्या खेळीच्या जोरावर अँग्लो उर्दू प्रशाला संघाने एसएनबीपी प्रशालेचा 86 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 127 धावा केल्यावर अँग्लो उर्दू प्रशाला संघाने एसएनबीपीचा डाव 8 बाद 41 असा मर्यादित राखला. 

संक्षिप्त धावफलक : 
एनसीएल मैदान : एसपीएम इंग्लिश माध्यम सेकंडरी स्कूल 10 षटकांत 1 बाद 142 (जय जाधव नाबाद 98, निनाद पळसुले 23) वि. वि. विबग्योर प्रशाला, मगरपट्टा 6 बाद 51 (समीरण पिसे 1-9), नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, फुलगांव 10 षटकांत 4 बाद 100 ( रोहित पवार 37, राजू बनसोडे 2-23) वि. वि. कर्मवीर भाऊराव पाटील माध्य. विद्यालय, येरवडा 3 बाद 73 (भिमाशंकर वडगीर नाबाद 24) 

विधी महाविद्यालय मैदान ः अँग्लो उर्दू प्रशाला, कॅम्प 10 षटकांत 3 बाद 127 (नाबीर शेख नाबाद 64, विकास गायके 2-19) वि. वि. एसएनबीपी प्रशाला, रहाटणी 8 बाद 41 (ऋत्विक हरवाणी 11, जनैद शेख 2-6), जेएसपीएम ब्लॉसम प्रशाला, नऱ्हे 10 षटकांत 6 बाद 71 (सुवन अग्रवाल 29) पराभूत वि. पवार पब्लिक स्कूल, हिंजवडी 3 बाद 74 (आर्चिसमन दास 43), बर्डस इंटरनॅशनल स्कूल, चिखली 10 षटकांत 8 बाद 52 (श्रेयस मंडीलकर 23, वेदांत गायकवाड 4-10) पराभूत वि. डीआयसी इंग्लिश माध्यम स्कूल, निगडी 4.1 षटकांत 1 बाद 53 (रुद्रव शिरभाटी 32) 

सनराईज स्कूल मैदान ः जुडसन प्रशाला, पिंपरी 10 षटकांत 2 बाद 85 (अश्‍विन वऱ्हाडे नाबाद 30, लौकिक नामधरे 19) पराबूत वि. मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर 7.3 षटकांत 1 बाद 86 (सत्यम अंबडवार नाबाद 34, गुणाजी मोहिते नाबाद 24), एंजल मिकी मिने स्कूल, हडपसर 10 षटकांत 4 बाद 86 (राहुल गेहलोत 40, गंधार देऊसकर 2-15) वि. वि. भावे स्कूल सर्वबाद 30 (शिवम बिघणे 3-5), सीईएस एस. चैतन्य इंग्लिश माध्यम स्कूल, रास्ता पेठ 10 षटकांत 3 बाद 98 (सत्यम चौधरी नाबाद 19, अकिब शेख 18) वि. वि. पुणे इंटरनॅशनल स्कूल, टिंगरेनगर 5 बाद 45 (अमिन शेख 2-13), लोकसेवा इंग्लिश माध्यम स्कूल, फुलगांव 10 षटकांत 8 बाद 23 (रितेश राहेरकर 3-6) पराभूत वि. पुणे पोलिस पब्लिक स्कूल, शिवाजीनगर 4.4 षटकांत 2 बाद 24 (रितेश राहेरकर नाबाद 13)


​ ​

संबंधित बातम्या