World Cup 2019 : वर्ल्डकपमध्ये आता खेळपट्टयाही वादात; श्रीलंकेची आयसीसीकडे तक्रार

वृत्तसंस्था
Saturday, 15 June 2019

श्रीलंकेचे संघ व्यवस्थापक अशंथा दि मेल यांनी काल (ता.14) आयसीसीकडे विश्वकरंडकातील खराब खेळपट्ट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. खेळपट्ट्यांसह त्यांनी अपुऱ्या ट्रेनिंग सुविधा आणि राहण्याच्या खराब सोयीबद्दलही तक्रारही केली आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : श्रीलंकेचे संघ व्यवस्थापक अशंथा दि मेल यांनी काल (ता.14) आयसीसीकडे विश्वकरंडकातील खराब खेळपट्ट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. खेळपट्ट्यांसह त्यांनी अपुऱ्या ट्रेनिंग सुविधा आणि राहण्याच्या खराब सोयीबद्दलही तक्रारही केली आहे. 

''आमच्या चारही मॅच कार्डिफ आणि ब्रिस्टल येथे झाल्या. या दोन्ही मैदानावर आयसीसीने हिरवी खेळपट्टी तयार केली होती. याउलट त्याच मैदानावर इतर संघांसाठी जास्त धावा होऊ शकतील अशी खेळपट्टी तयार करण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर होणाऱ्या सामन्यातही हिरवी खेळपट्टी तयार केली गेली आहे. त्याबद्दल आमची तक्रार नाही मात्र, आयसीसीचे एका संघासाठी एक तर इतरांसाठी वेगळे नियम आहेत आणि हे आम्हाला पटत नाही,'' असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. 

विश्वकरंडकात चारपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवूनही श्रीलंका सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. याचे सारे श्रेय पावसाला जाते. कारण बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध झालेले दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना दोन गुण मिळाले आहेत. 

''कार्डिफमध्ये आमच्या सरावासाठी सोईसुविधाही नीट नव्हत्या. आम्ही या साऱ्याबद्दल आयसीसीला चार दिवसांपूर्वी पत्र लिहले आहे तरी आम्हाला अद्दयाप कोणतेही उत्तर मिळालेले नाही,'' असेही अशंथा यांनी सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या