राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी राज्य बेसबाॅल संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 November 2019

जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी केला महाराष्ट्राचा मुला-मुलींचा बेसबॉल संघ जाहीर.

सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे.

जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी जाहीर केलेला महाराष्ट्राचा मुला-मुलींचा बेसबॉल संघ असा. मुले : ऋत्वेज सूर्यकांत माने (कोल्हापूर विभाग, मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हस्वड), रफिक उस्मान सय्यद (पुणे विभाग, सुरवसे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर), अनिकेत किरण गाटे (पुणे विभाग, सुरवसे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर), रोहन शामकांत पाटील (नाशिक विभाग, राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चाळीसगांव), प्रेम राजू पठाडे (पुणे विभाग, सेठ ज्योतिप्रसाद विद्यालय, दौंड), चिराग जितेंद्र सोनवणे (मुंबई विभाग, बी.के.बीला कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स व सायन्स, कल्याण), श्रेयश दिपक फडतरे (कोल्हापूर विभाग, दहिवडी कॉलेज, दहिवडी), शशांक राजकमल विश्‍वकर्मा (औरंगाबाद विभाग, देवगिरी कॉलेज, औरंगाबाद), रविराज शाम साळवे (नाशिक विभाग, राजेश्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चाळीसगांव), विकास अशोक कुलकर्णी (पुणे विभाग, संगमेश्‍वर कॉलेज, सोलापूर), शुभम विठ्ठलराव सैरिसे (अमरावती विभाग, महात्मा जोतीबा फुले महाविद्यालय, भातुकली), अयानऊद्दीन बहिऊद्दीन सय्यद (नागपूर विभाग, डी.आर.बी.सिधू महाविद्यालय, नागपूर), कुणाल अनिल शिंदे (नाशिक विभाग, डॉ. एम.एस.गोसावी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, नाशिक), प्रथमेश सुनील सिंग (अमरावती विभाग, ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेज, अमरावती), तेजस अनिल विद्यासागर (औरंगाबाद विभाग, सौ.के.एस.कनिष्ठ महाविद्यालय, बीड), प्रणव अरुण वावरे (पुणे विभाग, अबासाहेब काकडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शेवगांव).

या संघाचे प्रशिक्षक म्हणून अशोक सरोदे तसेच व्यवस्थापक म्हणून अभिषेक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
मुली ः सुजाता सुधीर थोरवडे (कोल्हापूर विभाग, विठामाता ज्युनिअर कॉलेज, कऱ्हाड), मोनिका पतंगराव खंडागळे (कोल्हापूर विभाग, विठामाता ज्युनिअर कॉलेज, कऱ्हाड), वैष्णवी धनाजी जाधव (कोल्हापूर विभाग, एस.जी.एम कॉलेज, कऱ्हाड), सायली सुनी यादव (पुणे विभाग, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर), वेदिका संजय सुरकुटे (लातूर विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर), राजेश्‍वर राहूल बनसोडे (लातूर विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर), धनश्री ज्ञानेश्‍वर माळी (नाशिक विभाग, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज, चाळीसगांव), वंशिका गजानन शेलोकर (अमरावती विभाग, महात्मा ज्योतीबाब फुले कॉलेज, अमरावती), अदिती अशोक सरोदे (मुंबई विभाग, फादर ऍग्नेल मल्टीपर्पज स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाशी), विजया सुभाष उदमले (पुणे विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा), साक्षी बापू लगाडे (कोल्हापूर विभाग, विठामाता ज्युनिअर कॉलेज, कऱ्हाड), अनिशा वसंत हांगे (औरंगाबाद विभाग,श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्‍वरी कन्या विद्यालय, अंबाजोगाई), रसिका राजेंद्र पाटील (कोल्हापूर विभाग, पी.बी.पाटील ज्युनिअर कॉलेज, मुधाळ), तनुजा किरण झुरंगे (पुणे विभाग,संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय, तळेगांव ढमढेर), सेजल प्रमोद जाधव (औरंगाबाद विभाग, देवगिरी कॉलेज, देवगिरी), सेजल रुपेश गुप्ता (अमरावती विभाग,भगवंतराव शिवाजी पाटील ज्युनिअर कॉलेज, परतवाडा).

या संघाचे प्रशिक्षक म्हणून कविता गिते तसेच व्यवस्थापक म्हणून अभिषेक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या