World Cup 2019 : स्मिथकडून अखेर कोहलीचे कौतुक 

वृत्तसंस्था
Tuesday, 18 June 2019

प्रेक्षकांच्या अशा वर्तनाची मला आता सवय झाली आहे. मी दुर्लक्ष करतो. पण, एका खेळाडूच्या यातना ओळखून कोहलीने केलेली कृती कुठल्याही खेळाडूला अभिमान वाटावी अशीच होती

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताविरुद्धच्या सामन्यात प्रेक्षक ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची खिल्ली उडवत होते. तेव्हा कोहलीने फलंदाजी करताना प्रेक्षकांसमोर जाऊन तसे न करण्याची आणि टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. कोहलीच्या या वर्तनाचे सर्व स्तरातून लगोलग कौतुक झाले. पण, स्मिथने तब्बल आठ दिवसांनी कोहलीचे आभार मानले. 

स्मिथ म्हणाला, "प्रेक्षकांच्या अशा वर्तनाची मला आता सवय झाली आहे. मी दुर्लक्ष करतो. पण, एका खेळाडूच्या यातना ओळखून कोहलीने केलेली कृती कुठल्याही खेळाडूला अभिमान वाटावी अशीच होती.'' 

नक्की काय झाले होते?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात विराट फलंदाजी करत असताना काही प्रेक्षक बहुतेक त्यातील काही भारतीय असावेत, स्टीव स्मिथ आणि वॉर्नरला उद्देषून त्यांची चेंडू कुरतडल्या प्रकरणी हुर्यो उडवत होते, हे विराटच्या लक्षात आले त्याने लगेचच प्रेक्षकांकडे पाहात, तुम्ही असे करू नका त्यांना प्रोत्साहीत करा असे हातवारे करून सांगितले.

स्मिथ सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना लोकांनी त्याच्याकडे पाहून चिटर चिटर म्हणायला सुरवात केली. कोहलीने मात्र, त्यांना चिटर म्हणू नका, टाळ्या वाजवा असे सांगितले. प्रेक्षकांना विराटची सुचना ऐकली आणि स्मिथ, वॉर्नरला टाळयांनी दाद दिली. विराटचा हा खिळाडूपणा आणि स्मिथच्या लक्षात आला आणि हस्तांदोलन करून विराटचे आभार मानले.

सामन्यानंतर याबाबत बोलताना विराट म्हणाला, ''त्याने माफी मागितली आहे. आता त्याची हुर्यो उडविण्याची गरज नाही. मला भारतीय चाहत्यांना असे करुन चुकीचे उदाहरण बनणे मान्य नव्हते. माझ्याबाबतीतही हेच घडले असते तर मलाही आवडले नसते.''
 


​ ​

संबंधित बातम्या