काेल्हापूरच्या सुदेष्णा शिवणकरने गाजविला दिवस

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 November 2019

सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्सच्या सुदेष्ण शिवणकर हिने 12 सेंकद 01 वेळ नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.

सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्सच्या सुदेष्ण शिवणकर हिने 12 सेंकद 01 वेळ नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.

तिच्या पाठोपाठ हडपसर (पुणे) येथील लोणकर हायस्कूलच्या अवंतिका नरळे हिने 12 सेंकद 03 वेळ नोंदवित द्वितीय तसेच सिंहगड (पुणे) येथील सिल्व्हर डेल स्कूलमधील श्रेया शेडगे हिने 12 सेंकद 05 वेळ नोंदवित तृतीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेतील विविध वयोगटाचा निकाल असा

14 वर्षाखालील मुले ः 600 मीटर धावणे ः राजेंद्र इंफाळ (1ः 30ः 20, आण्णासाहेब वैशंपायन विद्यालय, नाशिक विभाग), नागेश रम्या वसावे (1ः 30ः 50, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडापीठ), कृतांश किशोर चित्ते (1 ः 31 ः 30, सिम्बॉयसिस स्कूल, नाशिक विभाग).

14 वर्षाखालील मुली ः 600 मीटर धावणे ः खूशी उमेश (1 ः 45 ः 59, पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड), आकांक्षा सोदिया (1 ः 46 ः 20, भगवती गर्ल्स हायस्कूल, नागपूर विभाग), स्मिनल पंडीत (1 ः 46 ः 30, सेंट झेविअर्स हायस्कूल, कोल्हापूर विभाग). 

100 मीटर धावणे ः दिव्यांग लांडे (12 ः 06 उद्धव अकदामी, पुणे), श्रेयशी विश्‍वास (13 ः 00 लोखंडवाला फौंडेशन स्कूल, मुंबई), सानवी पाठक (13 ः 00 मॉडर्न स्कूल, कोराडे). 

17 वर्षाखालील मुले व मुली

17 वर्षाखालील मुले व मुली ः 800 मीटर धावणे ः चेतन चव्हाण (2 ः 01 ः 05, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडापीठ), सिद्धेश चौधरी (2 ः 02 ः 01, न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी), दिपक सिंग (2 ः 03 ः 02 प्रार्थना इंग्लिश हायस्कूल, मुंबई विभाग).

मुली -ः शिवेच्छा पाटील (2 ः 17 ः 06 फर्ग्युसन कॉलेज, पुणे), स्तुती एडनवाला (2 ः 20 ः 08, डॉन बॉस्को स्कूल, नाशिक), प्राची देवकर (2 ः 23 ः 08, स्वातंत्र्य सैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालय, तांबवे, कोल्हापूर विभाग).

उंची उडी ः स्फुर्ती सुभाष माने (1. 62 मीटर डी.के.ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी), श्रावणी देसावळे (1.59 मीटर, विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, साखराळे, कोल्हापूर), आर्या भांडे (1.53 मीटर, यशोधाम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुंबई).

19 वर्षाखालील मुले व मुली 

19 वर्षाखालील मुले व मुली ः 800 मीटर धावणे ः प्रकाश गडदे (1 ः 58 ः 17 क्रीडा प्रबोधिनी, क्रीडापीठ), इंद्रजीत फराकटे (1 ः 58 ः 50, किसनराव मोरे ज्युनिअर कॉलेज, सरवडे, कोल्हापूर विभाग), सिद्धांत पुजारी (2 ः 00 ः 10 राजाराम ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर).

मुली -ः साक्षी पाटील (2 ः 25 ः 06 भोसला मिलटरी स्कूल, नाशिक), शितल भगत (2 ः 27 ः 08 न्यू इंग्लिश स्कूल, फूरसुंगी), केशर दड्डे (2 ः 28 ः 08 विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर).


 सुदेष्णा शिवणकर

 


​ ​

संबंधित बातम्या