जागतिक रेसलिंग स्पर्धेत सुधीर पुंडेकरला रौप्यपदक 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

या स्पर्धेतील अंतिम फेरीत भारताच्या सुधीरने युक्रेनच्या मल्लाबरोबर कडवी झुंझ दिली. 

सातारा : बुडापेस्ट (हंगेरी) येथे युनायटेड वर्ल्ड स्पोर्टस के फेडरेशनच्या वतीने झालेल्या जागतिक ग्राफलिंग रेसलिंग स्पर्धेत मुळीकवाडी (ता. फलटण) सुधीर हनमंत पुंडेकर याने 92 किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत 15 देश सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप

त्याला एनआयएस प्रशिक्षक प्रा.पैलवान अमोल साठे, उमर मुक्तार तांबोळी ,जयदेव म्हामने यांचे मार्गदर्शन लाभले. 

हेही वाचा : संघर्षातून यशाचा राजमार्ग शोधणाऱ्या सुधीरची वर्ल्ड पॅन्क्रिशन स्पर्धेसाठी निवड

या यशाबद्दल त्याचे पुण्याचे धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, नवनाथ जगताप, मुंबई धर्मादाय आयुक्त मोहन गाडे, एमआयटी कॉलेजचे संस्थापक विश्वनाथ कराड , किशोर देसाई, शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहेबराव पवार, कुस्ती मल्लविध्या महासंघ अध्यक्ष पैलवान गनेश मानुगडे, शहाजीबुवा रामदासी, पैलवान मंगेश फडतरे, पैलवान अमोल फडतरे, पैलवान लुनेश गोरड यांनी शुभेच्छा दिल्या. 

जरुर वाचा : कुस्तीगीर परिषदेचा आखाडाही शरद पवारांनीच जिंकला !


​ ​

संबंधित बातम्या