टेनिसपटू सुमीतचे दुसरे चॅलेंजर जेतेपद

वृत्तसंस्था
Monday, 30 September 2019

- भारताचा टेनिसपटू सुमीत नागल याने कारकिर्दीतील दुसरे एटीपी चॅलेंजर विजेतेपद पटकाविले.

- ब्युनॉस आयर्समधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने स्थानिक खेळाडू फॅकुंडो बॅग्नीसवर 6-4, 6-2 अशी मात केली.

- सामना दोन सेटमध्ये संपला असला, तरी एक तास 38 मिनिटांचा कालावधी 

ब्युनॉस आयर्स - भारताचा टेनिसपटू सुमीत नागल याने कारकिर्दीतील दुसरे एटीपी चॅलेंजर विजेतेपद पटकाविले. 

ब्युनॉस आयर्समधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने स्थानिक खेळाडू फॅकुंडो बॅग्नीसवर 6-4, 6-2 अशी मात केली. सुमीतला सातवे, तर बॅग्नीसला आठवे मानांकन होते. जागतिक क्रमवारीत सुमीत 161वा, तर बॅग्नीस 166वा आहे. 
सुमीतने उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित ब्राझीलच्या थियागो मॉंटीएरोचा 6-0, 6-1 असा धुव्वा उडविला होता. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. याचा निर्णायक लढतीत त्याला फायदा झाला. 
क्‍ले कोर्टवर दोन्ही खेळाडू निर्धाराने खेळले. पहिल्या सेटमध्ये सुमीतने नवव्या गेममध्ये ब्रेक मिळविला. त्यानंतर त्याने सर्व्हिस आरामात राखली. दुसऱ्या सेटमध्ये बॅग्नीसचे फटके चुकू लागले. याचा पाचव्या आणि नंतर सातव्या गेममध्ये सुमीतने ब्रेक मिळविला. यात सातव्या गेममध्ये पाच वेळा ड्यूस झाला. तिसऱ्या ब्रेकपॉइंटला ब्रेक नोंदवीत सुमीतने 5-2 अशी भक्कम आघाडी घेतली. मग त्याने सर्व्हिस राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. 
--- 
दृष्टिक्षेपात 
- सुमीत यापूर्वी बंगळूरमधील स्पर्धेत दोन वर्षांपूर्वी विजेता 
- दक्षिण अमेरिकेतील क्‍ले कोर्टवर अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय 
- सामना दोन सेटमध्ये संपला असला, तरी एक तास 38 मिनिटांचा कालावधी 
 


​ ​

संबंधित बातम्या