World Cup 2019 : मग लॉर्ड्सला सर्वोत्तम म्हणायचे तरी कसे?

सुनंदन लेले
Monday, 15 July 2019

लॉर्डस् क्रिकेट मैदानाला रसिक क्रिकेटची पंढरी मानतात. मैदानावर गेले की अगदी भारावून जातात. पण तसे बघायला गेले तर या मैदानात असलेल्या काही मूलभूत चुकांमुळे लॉर्डसला जगातील सर्वोत्तम क्रिकेट मैदान कसे म्हणायचे असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस् क्रिकेट मैदानाला रसिक क्रिकेटची पंढरी मानतात. मैदानावर गेले की अगदी भारावून जातात. पण तसे बघायला गेले तर या मैदानात असलेल्या काही मूलभूत चुकांमुळे लॉर्डसला जगातील सर्वोत्तम क्रिकेट मैदान कसे म्हणायचे असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

एकतर हे मैदान गोल नसल्याने सीमारेषा विचित्र आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मैदानाला एका बाजूने दुसर्‍या बाजूला प्रचंड उतार आहे ज्याचा परिणाम खेळावर सतत होत राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे जगातील सर्व मैदानांवर साइट स्क्रीनचे मापदंड असताना लॉर्डस् मैदानावरील पॅव्हेलियनच्या बाजूचा साइट स्क्रीन छोटा आहे आणि त्याच्या समोर सदस्य सामना बघायला बसतात. आणि शेवटची गोष्ट म्हणजे लॉर्डस् मैदानावरचे कर्मचारी अनावश्यक उर्मटपणे वागत असल्याने या मैदानावर गेल्यावर स्वागताचा, आनंदाचा फील येत नाही. 


​ ​

संबंधित बातम्या