'एसपीं' मुळेच आम्ही करुन दाखवलं : पाेलिसांची भावना

प्रवीण जाधव
Friday, 6 December 2019

सातारा : तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा पोलिस दलाच्या क्रीडा पथकाने कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेतील मानाची चॅम्पियनशिप मिळविण्याचा बहुमान मिळवला. पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना व डॉ. अनिभव देशमुख यांच्यानंतर तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नांतून साताऱ्याला हे यश मिळाले आहे.

सातारा : तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा पोलिस दलाच्या क्रीडा पथकाने कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेतील मानाची चॅम्पियनशिप मिळविण्याचा बहुमान मिळवला. पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना व डॉ. अनिभव देशमुख यांच्यानंतर तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नांतून साताऱ्याला हे यश मिळाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप
 
दर वर्षी संपूर्ण देशभरात क्रीडा स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये परिक्षेत्रीय स्पर्धांमधील चॅम्पियनशिप हा पहिला व जिल्ह्यांच्या दृष्टीने मानाचा चषक असतो. त्यासाठी सर्व जिल्ह्यांतील पोलिस खेळाडू प्रयत्न करतात. खेळांडूचे प्रयत्न असले, तरी त्या- त्या जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांच्या स्वभावाचा व त्यांच्या जिद्दीचाही हा चषक मिळविण्यात महत्त्वाचा वाटा असतो. पोलिस दलाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा कोल्हापूर परिक्षेत्रातील "चॅम्पियनशिप'पासून वंचित होता. जिल्हा पोलिस दलात देशपातळीवर नाव कमावलेले चांगले खेळाडू असूनही हा चषक साताऱ्याला नेहमीच हुलकावणी देत राहिला. याची कारणमिमांसा पहिल्यांदा के. एम. एम. प्रसन्ना यांनी केली.

हेही वाचा : पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार 

क्रीडा स्पर्धांच्या नावाखाली दीड- दोन महिने आरामात काढणाऱ्या जुन्या खोंडांना त्यांनी पहिल्यांदा डच्चू दिला. त्यानंतर चांगल्या व ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंना उत्कृष्ट साधनसुविधा पुरविल्या. त्याचा खेळाडूंच्या मनोबलावर चांगला परिणाम झाला. परिणामी 2013 मध्ये जिल्हा पोलिस दलाला पहिल्यांदा कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिपच्या मानाचे पान मिळाले. त्यानंतर त्याच टीमने डॉ. अभिनव देशमुख यांच्या काळात यश मिळवले.

अवश्य वाचा : #MondayMotivation एकीचे बळ 
 
खेळाडूंना प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन व आहार हे देण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केल्यास यश निश्‍चित खेचून आणता येते हा प्रसन्नांनी दाखविलेला मार्ग तब्बल सहा वर्षांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बरोबर जोखला व अंमलात आणला. क्रीडा स्पर्धांसाठी विविध पोलिस ठाण्यांतून खेळाडू साताऱ्यात बोलवण्यापासून त्यांचे सर्व गोष्टींवर बारकाईन लक्ष होते. खेळाडूंशी व क्रीडा प्रमुखांशी झालेल्या चर्चेनंतर कोण-कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे, याची त्यांनी माहिती करून घेतली. त्यानंतर एकएका गोष्टीची पूर्तता त्यांनी अत्यंत बारकाईने केली. खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी आणले. दुखापत टाळून योग्य पद्धतीने शरीराची व मसल्सची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी फिजिओथेरपिस्ट व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच, फिटनेस फर्स्ट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गायकवाड यांनी साताऱ्यात येऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले.

जरुर वाचा : विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंचा झाला इतका खर्च 

त्याचबरोबर खेळाडूंच्या आहाराकडेही विशेष लक्ष देण्यात आले होते. संपूर्ण महिनाभर अधीक्षकांचे खेळाडूंकडे वैयक्तिक लक्ष होते. वेळोवेळी त्या त्यांना प्रोत्साहन देत होत्याच; परंतु संघ ज्या वेळी स्पर्धेसाठी सांगलीकडे रवाना होणार होते, त्या दिवशी अधीक्षकांना पुण्याला कार्यक्रम होता. तेथून पुढे त्यांना जायचे होते, तरीही पुण्यातील कार्यक्रम झाल्यानंतर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्या साताऱ्यात आल्या. नंतर नियोजित कार्यक्रमाला गेल्या. या सर्वांचा सकारात्मक परिणाम झाला आणि आम्हाला तब्बल सहा वर्षांनी चॅम्पियनशिपचा मान पुन्हा मिळवता आल्याची भावाना खेळाडूंनी व्यक्त केली. 

डेंगीवर मात करून लढाई जिंकली 

क्रीडा स्पर्धांच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना मुख्यालयात बोलावण्यात आले. याच काळात दोन यशांमध्ये महत्त्वाची भूमिका असणारे क्रीडा प्रमुख शशिकांत गोळे हे डेंगीमुळे आजारी पडले. डेंगीतून सावरतात तोच औषधांचा परिणाम त्यांचे फुफ्फुस, किडनी, लिव्हर यावर झाला. पोटात पाणी झाले. रक्तदाबही खूप वाढला होता. या सर्व परिस्थितीत ते आजारपणाशी तब्बल 20 दिवस झगडत होते. रुग्णालयातून सुटल्यानंतर मात्र, त्यांना क्रीडा स्पर्धांच्या ओढीने स्वस्थ बसू दिले नाही. अवघ्या चार दिवसांत ते मैदानात पुन्हा हजर झाले. तोपर्यंत ग्राऊंड इनचार्ज शिवाजी जाधव त्यांची जागा सांभाळत होते.

जरुर वाचा  महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

श्री. गोळे आजारपणातून मैदानात हजर झाल्यावर नूरच पालटला. अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यावर त्यांनी खेळाडूंवरही पूर्ण जोर लावला. त्याचा परिणाम सहाजिकच साताऱ्याला सर्वसाधारण विजेतेपद मिळण्यात झाला. स्वीमिंग, क्रॉसकंन्ट्री, ऍथलेटिक्‍स, व्हॉलिबॉल व बॉक्‍सिंग या पाच प्रकारांत जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळाले. या यशात अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, सहायक अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे यांचाही हातभार लागला.

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या