सुप्रिया निंबाळकर ठरली आयर्न मॅन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 July 2019

कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर कोणतेही काम अवघड नाही. प्रचंड इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सुप्रिया निंबाळकर हिने "आयर्न मॅन' शर्यत पूर्ण केली. तिने दक्षिण महाराष्ट्रातील पहिली "आयर्न मॅन' होण्याचा बहुमान मिळवला आहे. वडिलांच्या प्रेरणेने ती राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू बनली आहे. 

कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर कोणतेही काम अवघड नाही. प्रचंड इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सुप्रिया निंबाळकर हिने "आयर्न मॅन' शर्यत पूर्ण केली. तिने दक्षिण महाराष्ट्रातील पहिली "आयर्न मॅन' होण्याचा बहुमान मिळवला आहे. वडिलांच्या प्रेरणेने ती राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू बनली आहे. 

स्वतःला अजमावण्याच्या जिद्दीने तिने या स्पर्धेचे ध्येय निश्‍चित केले. जगभरातील ही एक कठीण स्पर्धा आहे. त्यात शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. तिने वर्षापूर्वी सरावाला सुरवात केली. वडील विराज निंबाळकर यांच्याकडून लहानपणापासूनच जलतरणाचे धडे घेतले होते. स्पर्धेतील एका आव्हानाची तयारी पूर्ण झाली होती. या नंतर राजेंद्र देसाई यांच्याकडून दमसास वाढवण्यासाठी आणि पंकज रावळू व आशिष रावळू यांच्याकडून धावणे आणि सायकलिंगचे धडे गिरवण्यास सुरवात केली. वर्षाभर सातत्यपूर्ण सराव सुरू होता. दररोज चार ते पाच तास सराव आणि सुट्टीच्या दिवशी सात तासाहून अधिकचा सराव केला.

दरम्यानच्या काळात विविध मॅरेथॉनमध्ये स्वतःला अजमावून पाहणे सुरू होते. फेब्रुवारीमध्ये कोलंबो येथे झालेल्या हाफ आयर्न मॅन स्पर्धेत तिने फास्टेस्ट इन इंडियाचा मान मिळवला. 

या अनुभवाच्या जोरावर ती आयर्न मॅन स्पर्धेत सहभागी झाली. स्पर्धेत प्रारंभी चार किलोमीटर जलतरण पूर्ण करावे लागते. झ्यूरीक (स्वीर्झलॅण्ड) मधील हवामान थंड आहे. त्यामुळे पाण्याचे तापमान देखील अधिक कमी होते. हे आव्हान तिने लीलया पार केले. या नंतर 180 किलोमीटर कठीण वळणाच्या आणि चढ उताराच्या रस्त्यावर सायकलिंग केले. सायकल खराब झाल्यामुळे स्पर्धेतील सर्वात मौल्यवान दीड तासांचा वेळ वाया गेला. या नंतर 42 किलोमीटर धावण्याने स्पर्धेचा शेवट झाला. वाया गेलेल्या वेळेबरोबरच स्पर्धा सुप्रियाने 15 तास 52 मिनिटात पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण करताच सुप्रिया निंबाळकर दक्षिण महाराष्टातील आयर्न मॅन किताब पटकवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. 

वडिलांच्या प्रेरणेने मी खडतर आव्हानांना सामोरे गेली आहे. स्पर्धा माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर म्हणावी लागेल. आव्हाने पेलण्याची आणि त्यावर मात करण्याची शक्ती मला स्पर्धेतील सहभागाने आणि विजयाने मिळाली आहे. 
- सुप्रिया निंबाळकर,
आयर्न मॅन 


​ ​

संबंधित बातम्या