नगरच्या सुयोग वाघला कॉमनवेल्थमध्ये बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक
नगर : नवी दिल्ली येथील एक ते सात जुलै दरम्यान झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा झाल्या. यात वीस वर्षांखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत नगरच्या सुयोग संजय वाघ याने भारतासाठी सुवर्ण पदक मिळवले.
नगर : नवी दिल्ली येथील एक ते सात जुलै दरम्यान झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा झाल्या. यात वीस वर्षांखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत नगरच्या सुयोग संजय वाघ याने भारतासाठी सुवर्ण पदक मिळवले.
सुयोग हा अठरा वर्षाचा असून तो सध्या पेमराज सारडा महाविद्यालयात एफ. वाय. बी. कॉम. मध्ये शिक्षण घेतो आहे. त्याने यापूर्वी राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत तीन वेळा सुवर्णपदकही मिळवलेले आहे.
1 ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या अबुधाबी मास्टर टूर्नामेंटसाठी त्याची निवड झालेली आहे. त्याला विशाल गुजराथी व प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सुयोग हा फिडे मास्टर आहे. डॉ. संजय वाघ यांचा तो मुलगा आहे.