जागतिक मार्शल आर्टस स्पर्धेत स्वप्निल लाटेस सुवर्णपदक 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

कोल्हापूर - दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक मार्शल आर्टस स्पर्धेत पिन्चॅक सिलॅट खेळामध्ये रेंदाळ (ता. हातकणगले) येथील स्वप्निल रामचंद्र लाटे यांने सुवर्णपदक पटकावले. 

कोल्हापूर - दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक मार्शल आर्टस स्पर्धेत पिन्चॅक सिलॅट खेळामध्ये रेंदाळ (ता. हातकणगले) येथील स्वप्निल रामचंद्र लाटे यांने सुवर्णपदक पटकावले. 

दक्षिण कोरिया येथे ग्लोबल असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्पोर्टस मिनिस्ट्री व ऑलिंपिक कमिटी कोरिया यांनी जागतिक मार्शल आर्टस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सुमारे 44 देश सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी स्वप्निल लाटे व अंशुल कांबळे याची भारतीय संघात निवड झाली होती. या दोघांनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. यामध्ये स्वप्निल याला सुवर्ण तर अंशुल कांबळे याने ब्रॉंझ पदक मिळविले.

नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल खेळाचा कसून सराव करीत होता. यासाठी तो शिरोळ येथून कसबा बावडा येथे रोज येत होता. वडीलांचे छत्र हरविलेल्या स्वप्निलला त्यांच्या आईचे पाठबळ नेहमीच मिळाले. आईने कर्ज काढून स्वप्निलला दक्षिण कोरियाला पाठविले होते. आईच्या अविरत कष्टाचे स्वप्निलने सुवर्णपदक मिळवून सार्थक केले. त्याचा या यशाचे कौतुक होत आहे. या खेळाडूंना पिन्चॅक सिलॅट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले, नितीन कांबळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारत कोटकर यांचे मार्गदर्शन मिळाले.  

 
 


​ ​

संबंधित बातम्या