Schoolympics 2019 : मॅप्रो स्कूलिंपिक्‍स स्पर्धेत तनिष्का देशपांडेने सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स १२ वर्षांखालील मुलींच्या एकेरी टेनिस स्पर्धेत तनिष्का देशपांडेने सुवर्णपदक पटकाविले

कोल्हापूर: मॅप्रो स्कूलिंपिक्‍स १२ वर्षांखालील मुलींच्या एकेरी टेनिस स्पर्धेत तनिष्का देशपांडेने सुवर्णपदक पटकाविले. महिमा शिर्केने रौप्य, तर श्रेया रावने कांस्यपदक मिळविले. दुहेरीत रिफात रहमान व श्रेया रावने बाजी मारली. रिद्धी आठमुठे व अनुष्का नवगिरेने रौप्य व अँजल जैन व अवनी जैनने कांस्यपदक मिळविले. विभागीय क्रीडासंकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धा झाली

निकाल असा :  एकेरी : तनिष्का देशपांडे (कोल्हापूर पब्लिक स्कूल) वि. वि. महिमा शिर्के (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल) (८-३), श्रेया राव (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. ऐश्‍वर्या दिगे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) (८-४). दुहेरी : रिफात रहमान व श्रेया राव (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. रिद्धी आडमुठे व अनुष्का नवगिरे (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) (८-०), अँजल जैन व अवनी जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. तन्वी मेहता व दिया शहा (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) (८-१).


​ ​

संबंधित बातम्या