विश्‍व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठाच्या पाच नाशिककर ऍथलिट्‌सची निवड 

नरेश शेळके
Monday, 8 April 2019

नागपूर : नापोली (इटली) येथे होणाऱ्या विश्‍व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी इंडियन युनिव्हर्सिटीचा (भारतीय) 42 ऍथलिट्‌सचा जम्बो संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 3 ते 14 जुलै या कालावधीत होईल. विश्‍व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी प्रथमच इतका मोठा संघ निवडण्यात आला. त्यात पात्रता निकष पार न करणाऱ्या काही ऍथलिट्‌सचा समावेश आहे. तर काहींना केवळ महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने स्थान मिळाले आहे. निवड झालेल्या संघात 20 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. 

निवड झालेल्या खेळाडूंचा प्रवास, निवास आणि इतर खर्च संबंधीत विद्यापीठाला करायचा आहे. भुवनेश्‍वर येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्यात आली. पुरुषांत मुंबई विद्यापीठाच्या जय शहा (तिहेरी उडी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा किसन तडवी (पाच हजार मीटर), बिपीन कुमार पटेल (दहा हजार मीटर) तर महिलांत दुर्गा देवरे (पंधराशे मीटर), कोमल जगदळे (तीन हजार मीटर स्टीपलचेस), आरती पाटील (पाच हजार मीटर), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्राजक्ता गोडबोले (पाच हजार मीटर) आणि निकीता राऊत (अर्ध मॅरेथॉन) यांचा समावेश आहे. याशिवाय मुळ नागपुरची असलेली आणि मंगलोर विद्यापीठाचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या ज्योती चौहानची स्टीपलचेस शर्यतीसाठी निवड करण्यात आली. 

किसन तडवी, बिपीन कुमार पटेल, दुर्गा देवरे आणि आरती पाटील या नाशिकच्या आहेत. कोमल ही मुळ सोलापुर जिल्ह्यातील असली तरी नाशिक येथे सराव करते. दोन वर्षापूर्वी झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधवने दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.

​ ​

संबंधित बातम्या