अंकिता रैना, गुणेश्वरनची ‘अर्जुन’साठी शिफारस

पीटीआय
Wednesday, 30 June 2021

आशियाई स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती अंकिता रैना आणि प्रजनेश गुणेश्वरन यांची टेनिस महासंघाने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. त्याचबरोबर ध्यानचंद पुरस्कारासाठी बलराम सिंग आणि एर्निको पिपेर्नो यांचे नाव सुचवले आहे.

नवी दिल्ली - आशियाई स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती अंकिता रैना आणि प्रजनेश गुणेश्वरन यांची टेनिस महासंघाने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. त्याचबरोबर ध्यानचंद पुरस्कारासाठी बलराम सिंग आणि एर्निको पिपेर्नो यांचे नाव सुचवले आहे.

जकार्ता येथे २०१८ मध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत अकिता आणि प्रजनेश यांनी एकेरीचे ब्राँझपदक जिंकले होते. टेनिस क्रमवारीत अंकिताचे भारताकडून एकेरीत सर्वोत्तम १८२ वे; तर दहेरीत ९५ वे स्थान आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत ती पदार्पण करणार आहे.

प्रजनेश हा पुरुषांमधील भारताचा नव्या पिढीचा खेळाडू आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळ त्याची पाच वर्षे वाया गेली नसती तर तो एक वेगळा खेळाडू म्हणून पुढे आला असता. पुरुषांच्या टेनिस क्रमवारीत तो १४८ व्या स्थानावर आहे. डेव्हिस करंडक स्पर्धेत त्याने पाच सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या