नामोमी ओसाकाचा सलग 22 वा विजय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 March 2021

गेल्या वर्षभरात तिचा पराभव झालेला नाही. तिच्या विजयी पथामध्ये गेल्या महिन्यातील ऑस्ट्रेलियन ओपनचाही समावेश आहे.

मियामी  : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नामोमी ओसाकाने अज्ला तोमल्जानोविकचा 7-6,6-4 असा पराभव करून मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या विजायसह ओसाकाने सलग 22 वा सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पहिल्या सेटचा निकाल टायब्रेकरवर लागलेल्या या सामन्यात ओसाकाने 13 बिनतोड सर्व्हिस केल्या.

गेल्या वर्षभरात तिचा पराभव झालेला नाही. तिच्या विजयी पथामध्ये गेल्या महिन्यातील ऑस्ट्रेलियन ओपनचाही समावेश आहे. पुरुषांच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित अलेक्‍झॅंडर झेरेवने ब्रेक पॉइंटवर तीन दुहेरी चुका केल्या, परिणामी त्याला 83 व्या मानांकित एमी रुसोविरोईकडून 6-1, 3-6, 1-6 अशा पराभवास सामोरे जावे लागले. अव्वल मानांकित डॅनिली मेदवेदेवने 37 वर्षीय येन हुसून लू याचा 6-2, 6-2 असा पराभव केला. 

सचिनसोबत खेळलेल्या युसूफ पठाणलाही कोरोनाची लागण​

जॅक डेपरची स्पर्धेतून माघार 

मियामी : एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी ओपन पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत गुरुवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या जॅक डेपरने प्रकृती नादुरुस्तीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. टेनिस कोर्टवर खेळताना डेपर अचानक खाली कोसळला. त्याला येथील दमट आणि उष्ण हवामानामुळे काही वेळ मूर्छा आली होती. 19 वर्षीय जॅक डेपरला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता.  


​ ​

संबंधित बातम्या