पराभव दिसू लागल्यावर दुखापतींचे खोटे कारण! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 July 2021

ॲज्ला तॉमलियांनोविक हिने जेलेना ऑस्तापेंको हिला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पराजित केले. मात्र या सामन्यातील तिसऱ्या सेटमध्ये ०-४ पिछाडीवर असताना ऑस्तापेंकोने मेडिकल ब्रेकची विनंती केली आणि प्रतिस्पर्धीत कोर्टवर सुरू झालेल्या वादंगाच्या रॅली सामन्यानंतरही सुरू राहिल्या.

लंडन - ॲज्ला तॉमलियांनोविक हिने जेलेना ऑस्तापेंको हिला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पराजित केले. मात्र या सामन्यातील तिसऱ्या सेटमध्ये ०-४ पिछाडीवर असताना ऑस्तापेंकोने मेडिकल ब्रेकची विनंती केली आणि प्रतिस्पर्धीत कोर्टवर सुरू झालेल्या वादंगाच्या रॅली सामन्यानंतरही सुरू राहिल्या.

तॉमलियांनोविकने पिछाडीनंतर ४-६, ६-४, ६-२ अशी बाजी मारली. ती तिसऱ्या सेटमध्ये ४-०, ४०-० आघाडीवर असताना ऑस्तापेंकोने मेडिकल ब्रेकची विनंती केली. पण त्यास तॉमलियांनोविक तयार नव्हती.

संपूर्ण सामन्यात तिला कसलाही त्रास होत नव्हता. अचानक कशी दुखापत झाली, अशी विचारणा करणाऱ्या तॉमलियांनोविकने केली. ती खोटे बोलतेय, असेही मुख्य पंचांना सांगितले. प्रतिस्पर्ध्याच्या खेळाची लय बिघडवण्यासाठी अनेकदा दुखापतीचे कारण दिले जाते. खेळाडू हरत असतानाच हा मेडिकल टाईमआऊट घेतला जातो. कोणाला खरच दुखापत झाली आहे आणि कोणाला नाही हे मी पक्के ओळखते, असेही तॉमलियांनोविकने म्हणाली.

ऑस्तापेंकोने याचे उत्तर दिले नसते तरच आश्चर्य होते. तिने तॉमलियांनोविक प्रतिस्पर्ध्याचा अवमान करते, असे वारंवार म्हटले. माझ्या दुखापतीबद्दल बोलण्याचा तिला आधिकारच काय? ती प्रतिस्पर्ध्याचा मानच ठेवत नाही. कोणत्याही खेळात कधीही दुखापत होऊ शकते. दुसऱ्या सेटपासूनच माझ्या मांडीचा स्नायू दुखावला होता. असह्य झाले तेंव्हाच मेडिकल ब्रेकची विनंती केली.


​ ​

संबंधित बातम्या