भारताच्या अंकिता रैनाचा UAE त डंका; जेतेपदाचा दुहेरी मुकूट!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

या जोडीने अंतिम सामन्यात स्पेनची अलियोना बोसोव्हा जादोइनोव आणि स्लोवाकियाची काजा जुवान या जोडीला 6-4 3-6 10-6  अशा फरकाने पराभूत केले.

भारताची आघाडीची महिला टेनिस खेळाडू अंकिता रैनाने दुबईतील मैदान मारले आहे. तिने कॅटरिनच्या साथीनं अल हबतूर ट्रॉफीवर नाव कोरले. कोरोनाजन्य परिस्थितीत प्रभावित झालेल्या वर्षातील तिचे हे तीसरे दुहेरी जेतेपद आहे. भारताची अंकिता आणि जॉर्जियाची कॅटरिनने 1 लाख डॉलर रुपयांच्या स्पर्धेत बाजी मारली.  

या जोडीने अंतिम सामन्यात स्पेनची अलियोना बोसोव्हा जादोइनोव आणि स्लोवाकियाची काजा जुवान या जोडीला 6-4 3-6 10-6  अशा फरकाने पराभूत केले. अंकिताचे यंदाच्या हंगामातील चौथी दुहेरी फायनल होती. तर कॅलेंडर इयरमधील सर्वात मोठी स्पर्धा होती. यापूर्वी तिने जिंकलेल्या दोन स्पर्धा या  25,000 डॉलरचे पारितोषिक असलेल्या होत्या. 

Inspiring Story : स्वप्न सत्यात येतं तेव्हा...

यंदाच्या वर्षात फेब्रुवारीमध्ये अंकिताने तीन स्पर्धेच्या अंतिम फेरिपर्यंत मजल मारली होती. तिने बिबियाने शूफ्सच्या साथीनं थायलंडमध्ये सलग जेतेपद मिळवले होते. जोधपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत स्नेहल मानेच्या साथीने तिला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.


​ ​

संबंधित बातम्या