Acapulco ATP 500 : बोपन्ना पुन्हा पाक टेनिसपटूच्या साथीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

10 वर्षांपूर्वी एकमेकांच्या साथीत खेळताना त्यांनी पुरुष दुहेरीत दबदबा निर्माण केला होता. त्यांनी 2010 मध्ये अव्वल 10 मध्ये स्थान मिळवले होते.

नवी दिल्ली : रोहन बोपन्नाने ॲकापुल्का एटीपी स्पर्धेत पाकिस्तानच्या ऐसाम ऊल हक कुरेशी याच्या साथीत खेळण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा या महिन्याच्या मध्यास सुरू होणार आहे.रोहन बोपन्नाने 15 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत ऐसाम आपला सहकारी असेल असे जाहीर केले. त्याने याची घोषणा करताना त्यास इडो पाक एक्‍सप्रेस म्हटले आहे. कुरेशीने याबाबतचे भारतीय क्रीडा संकेतस्थळाकडून झालेले ट्विट रिट्विट केले आहे. दरम्यान, संयोजकांनी जाहीर केलेल्या दुहेरी खेळाडूंच्या जोडीतही याचा उल्लेख आहे. हे दोघे सात वर्षांनी एकमेकांच्या साथीत खेळतील. 

INDvsENG: मातीच्या ढेकळात बॅटिंग करत इंग्लिश दिग्गजानं केली पिचची भविष्यवाणी

10 वर्षांपूर्वी एकमेकांच्या साथीत खेळताना त्यांनी पुरुष दुहेरीत दबदबा निर्माण केला होता. त्यांनी 2010 मध्ये अव्वल 10 मध्ये स्थान मिळवले होते. त्या वर्षी त्यांनी विम्बल्डन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती; तर अमेरिकन स्पर्धेत उपविजेते होते. 2011 च्या एटीपी अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती. ते  2014 मध्येही एकमेकांच्या साथीत खेळले होते.

जागतिक दुहेरी क्रमवारीत बोपन्ना ४० व्या; तर कुरेशी ४९ व्या स्थानी आहे. मेक्‍सीकोतील स्पर्धेत एकत्र येण्यापूर्वी रोहन ऑस्ट्रेलियन ओपन तसेच सिंगापूर स्पर्धेत बेन मॅकलॅश्‍लान याच्या साथीत; तर कुरेशी टोमिस्लाव ब्रकिक याच्या साथीत खेळला होता. दोन वर्षांपूर्वी कुरेशीने बोपन्नाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, पण आता ते विसरून दोघे एकत्र आले आहेत.
 


​ ​

संबंधित बातम्या