वादंगांना दूर ठेवत ओसाकाची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 May 2021

फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या कालावधीत मानसिक शांतता लाभण्यासाठी पत्रकार परिषदेस सामोरे न जाण्याचा निर्णय घेतल्याने नाओमी ओसाका चर्चेत होती. मात्र स्पर्धा सुरू झाल्यावर खेळाची चर्चा जास्त होईल, याची खबरदारी घेत तिने विजयी सलामी दिली.

पॅरिस - फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या कालावधीत मानसिक शांतता लाभण्यासाठी पत्रकार परिषदेस सामोरे न जाण्याचा निर्णय घेतल्याने नाओमी ओसाका चर्चेत होती. मात्र स्पर्धा सुरू झाल्यावर खेळाची चर्चा जास्त होईल, याची खबरदारी घेत तिने विजयी सलामी दिली.

द्वितीय मानांकित ओसाकाने रुमानियाच्या पॅट्रिशिया तिग हिला ६-४, ७-६ (७-४) असे पराजित केले. पत्रकार परिषदेमुळे खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्याचा खेळावर विपरीत परिणाम होतो, असे ओसाकाने स्पर्धेपूर्वी संगितले होते. त्यामुळे वादंगाच्या रॅली चांगल्याच रंगल्या. तिला पहिला सेट काहीसा सहज जिंकल्यावर दुसऱ्या सेटमध्ये आव्हानास सामोरे जावे लागले.

क्ले कोर्टवरील माझी कामगिरी प्रत्येक सामन्यागणिक उंचावते, त्यामुळे दुसऱ्या सेटमधील आव्हानाची फारशी चिंता नाही, असे तिने सांगितले. दरम्यान, काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली अँगेलिक केर्बर पहिल्याच फेरीत पराभूत झाली.


​ ​

संबंधित बातम्या