नोवाक जोकोविचचे उपांत्यपूर्व फेरी प्रवेशाचे अर्धशतक पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 July 2021

नोवाक जोकोविचने ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी प्रवेशाचे अर्धशतक पूर्ण करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अखेरच्या आठ पुरुष टेनिसपटूत स्थान मिळवले.

लंडन - नोवाक जोकोविचने ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी प्रवेशाचे अर्धशतक पूर्ण करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अखेरच्या आठ पुरुष टेनिसपटूत स्थान मिळवले. 

जोकोविचचा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीसही कस लागला नाही. त्याने १७ व्या मानांकित ख्रिस्तियन गॅरीन याला ६-२, ६-४, ६-२ असे पराजित केले. या लढतीतील दुसरा सेट अर्धा तास चालला, पण जोकोविचने पहिला आणि तिसरा सेट झटपट जिंकला होता. या विजयामुळे जोकोविचने ग्रँड स्लॅम उपांत्यपूर्व फेरी प्रवेशाचे अर्धशतक पूर्ण केले. या क्रमवारीत रॉजर फेडरर (५८) अव्वल आहे. 

संपूर्ण सामन्यात जोकोविचच्या सर्व्हिसवर दोनदाच ड्यूस झाला. हे सोडल्यास अव्वल मानांकिताच्या वर्चस्वास फारसे हादरा बसला नाही आणि जोकोविचने १२ व्यांदा विम्बल्डन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. जोकोविचने त्यानंतर लॉकर रूममध्ये आईस बाथ घेत उपांत्यपूर्व फेरीतील संभाव्य प्रतिस्पर्ध्यातील लढत बघितली.


​ ​

संबंधित बातम्या