सुवर्ण ग्रँड स्लॅमसाठी जोकोविच ऑलिंपिकमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 July 2021

सुवर्ण ग्रँड स्लॅमची विरळाच होणारी कामगिरी नोवाक जोकोविचला खुणावत आहे. त्यामुळेच त्याने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिंपिक जिंकण्याची प्रबळ इच्छा प्रेक्षकांच्या अनुपस्थितीच्या दुःखावर मात करेल, असे त्याने सांगितले.

बेलग्रेड - सुवर्ण ग्रँड स्लॅमची विरळाच होणारी कामगिरी नोवाक जोकोविचला खुणावत आहे. त्यामुळेच त्याने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिंपिक जिंकण्याची प्रबळ इच्छा प्रेक्षकांच्या अनुपस्थितीच्या दुःखावर मात करेल, असे त्याने सांगितले.

जोकोविचने माघार घेण्याचे ठरवले होते, पण सर्बियास सुवर्णपदक जिंकून देण्याची महत्त्वाकांक्षा माझ्यात जागृत करण्यात आली. ऑलिंपिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक आगळाच बहुमान असतो. त्यावेळी चाहते आहेत का, वातावरण कसे आहे हे मुद्दे गौण ठरतात, असे तो म्हणाला. क्रोएशियाच्या माजी ऑलिंपिकपटू ब्लँका व्लासिक यांनी जोकोविचला ऑलिंपिकला सहभागासाठी तयार केले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळ करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली असे तो म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या