ओसाका जगातील श्रीमंत महिला खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 June 2021

कोरोना महामारीमुळे स्पर्धा, तसेच पुरस्कर्त्यांवर विपरीत परिणाम झाल्यानंतरही नाओमी ओसाका हिने वर्षभरात सहा कोटी डॉलरची कमाई केली. एवढेच नव्हे तर गतवर्षीपेक्षा तिची कमाई २ कोटी ३० लाख डॉलरने वाढली.

न्यूयॉर्क - कोरोना महामारीमुळे स्पर्धा, तसेच पुरस्कर्त्यांवर विपरीत परिणाम झाल्यानंतरही नाओमी ओसाका हिने वर्षभरात सहा कोटी डॉलरची कमाई केली. एवढेच नव्हे तर गतवर्षीपेक्षा तिची कमाई २ कोटी ३० लाख डॉलरने वाढली. फोर्ब्जने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या महिला क्रमवारीत तिने अव्वल स्थान पटकावले आहे. 

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूत ओसाका आता १२ वी आहे. गतवर्षी ती २९ वी होती. एवढेच नव्हे तर जाहिरातीतून कमाई करणाऱ्या क्रीडापटूत ओसाका चौथी आहे. रॉजर फेडरर, बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स आणि टायगर वूडस् यांनीच तिला मागे टाकले आहे. ओसाकाचा दबदबा

  • २० हून जास्त पुरस्कर्ते
  • ६ कोटी डॉलर कमाई 
  • ५.५ कोटी पुरस्कर्त्यांकडून

​ ​

संबंधित बातम्या