पुण्याच्या अंकिताची पात्रतेत विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 May 2021

ऑलिंपिक पदक जिंकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूत समावेश केल्याचा आनंद अंकिता रैनाने फ्रेंच टेनिस स्पर्धेतील पात्रता फेरीची लढत जिंकत साजरा केला. अंकिताने तिच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्धीला पहिला सेट गमावल्यावर पराजित केले.

पॅरिस - ऑलिंपिक पदक जिंकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूत समावेश केल्याचा आनंद अंकिता रैनाने फ्रेंच टेनिस स्पर्धेतील पात्रता फेरीची लढत जिंकत साजरा केला. अंकिताने तिच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्धीला पहिला सेट गमावल्यावर पराजित केले. अंकिताने ॲरिना रोदिनोवा हिला पावसाने व्यत्यय आणलेल्या लढतीत ३६, ६-१, ६-४ असे पराजित केले.

अंकिता जागतिक क्रमवारीत १८२ व्या स्थानी आहे, तर रशियात जन्मलेली, पण ऑस्ट्रेलियातून खेळणारी ॲरिना १६८ वी आहे. अंकिताने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता स्पर्धेत तिसरी फेरी गाठली होती. आता अंकितासमोर पात्रतेत सतरावे मानांकन असलेल्या जी मिनेन हीचे आव्हान असेल.

दरम्यान, रामकुमारने पुरुष एकेरीच्या पात्रतेत सलामीची लढत जिंकली. त्याने अमेरिकेच्या मायेकल मिमोह याला २-६, ७-६, ६-३ असे हरवले.  जागतिक क्रमवारीत रामकुमार २१५ वा तर मिमोह १६८ वा आहे. टोकियो ऑलिंपिकची पात्रता जवळपास निश्चित असलेल्या अंकिता रैनाचा ऑलिंपिक पदक लक्ष्य योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.


​ ​

संबंधित बातम्या