बोपन्ना-दिवीज ऑलिंपिक पात्रतेपासून दूर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 July 2021

रोहन बोपन्ना तसेच दिवीज शरण ऑलिंपिकमध्ये टेनिस खेळात पुरुष दुहेरीची पात्रता साध्य करण्यास अपयशी ठरले. या स्पर्धेतून पात्र ठरलेल्या खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर माघार घेतली तरच जागतिक संयुक्त दुहेरी क्रमवारीत ११३ वे असलेल्या रोहन - दिवीजला संधी लाभेल.

नवी दिल्ली - रोहन बोपन्ना तसेच दिवीज शरण ऑलिंपिकमध्ये टेनिस खेळात पुरुष दुहेरीची पात्रता साध्य करण्यास अपयशी ठरले. या स्पर्धेतून पात्र ठरलेल्या खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर माघार घेतली तरच जागतिक संयुक्त दुहेरी क्रमवारीत ११३ वे असलेल्या रोहन - दिवीजला संधी लाभेल. त्यांच्या अपात्रतेमुळे भारताची मिश्र सांघिक स्पर्धा खेळण्याचीही संधी हुकली आहे. 

जागतिक दुहेरी क्रमवारीत रोहन ३८ वा, तर डावखुरा दिवीज ७५ वा आहे. ते व्यावसायिक स्पर्धांत क्वचितच एकमेकांच्या साथीत खेळतात. त्यामुळे त्यांचे संयुक्त मानांकन ११३ आहे. हे दोघे टोकियोत खेळण्याची शक्यता धूसर आहे. अर्थात पात्र खेळाडूंची नावे १६ जुलैस जाहीर होतील, त्यावेळीच चित्र स्पष्ट होईल. 

दुहेरी स्पर्धेतील २४ पैकी २२ जोड्यांच्या स्थानासाठी स्पर्धा असते. एका देशाच्या दोनपेक्षा जास्त जोड्या नसल्यामुळे ६० पर्यंत क्रमवारी असल्यास संधी असते. मोठ्या प्रमाणावर माघारी असल्यास एकेरीत खेळणाऱ्यांना दुहेरीसाठी पसंती देण्यात येते. त्यानंतरच केवळ दुहेरीत खेळणाऱ्यांचा विचार होतो. एकेरीत अनेक आघाडी खेळाडू खेळणार नाहीत. त्यामुळे एकेरीसह दुहेरीही खेळणारे जास्त खेळाडू ऑलिंपिकमध्ये असतील.


​ ​

संबंधित बातम्या