Qatar Open : सानिया मिर्झा उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

पुढच्या फेरीत या जोडीचा सामना अव्वल मानांकित चेक प्रजासत्ताकच्या बारबोरा क्रेजसिकोवा आणि कॅटरीना सिनियाकोवा यांच्याशी होणार आहे.

मुंबई : सानिया मिर्झाने आंद्रेजा क्‍लेपाक हीच्या साथीत कतार ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी गॅब्रिएला दार्वोवस्की - ॲना ब्लिंकोवा यांना 6-2, 6-0 असे पराजित केले. सानिया-आंद्रेजास स्पर्धेत मानांकन नव्हते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी चौथ्या मानांकि होत्या.

पुढच्या फेरीत या जोडीचा सामना अव्वल मानांकित चेक प्रजासत्ताकच्या बारबोरा क्रेजसिकोवा आणि कॅटरीना सिनियाकोवा यांच्याशी होणार आहे. या जोडीने नँदरलँडच्या  किकि बर्टेंस आणि लेसले पी केरखोव या जोडीला 4-6, 6-4, 13-11 अशी मात दिली आहे. 

साक्षीबरोबर सराव करताना सोनमच्या डोक्‍याला दुखापत; जखमेवर पाच टाके घालण्याची वेळ

सानिया मिर्झा तब्बल एका वर्षाच्या अंतरानंतर कोर्टवर उतरली आहे. यापूर्वी सानियाने  फेब्रुवारी 2020 मध्ये दोहा ओपनमध्ये सामना खेळला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खेळ लॉकडाउन झाला. जगभरातील प्रत्येक खेळावर याचा परिणाम झाला. सानिया मिर्झालाही कोरोनाची लागण झाली होती. यातून सावरुन ती पुन्हा कोर्टरवर उतरली आहे. मातृत्व कालावधीतून परतल्यानंतर नादियाच्या साथीनं तिने होबार्ट ओपन स्पर्धा जिंकली होती. 

सुमीतचा प्रथमच एटीपी विजय

सुमीत नागलने एटीपी मालिकेतील स्पर्धेत प्रथमच विजय मिळवला. त्याने ब्यूनोस आर्यस स्पर्धेत अर्जेंटिना ओपनच्या पहिल्या फेरीत जोआओ सौसा याला 6-2, 6-0 असे हरवून ही कामगिरी केली. त्याने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत विजय मिळवला असला तरी एटीपी मालिकेत ही कामगिरी केलेली नाही. जागतिक क्रमवारीत 150 वा असलेल्या सुमीतने त्याच्यापेक्षा 50 क्रमांकानी सरस असलेल्या प्रतिस्पर्ध्यास हरवले. 
 


​ ​

संबंधित बातम्या