पाय घसरल्याने सेरेना विल्यम्सने लढत सोडली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 July 2021

विम्बल्डन टेनिस स्पर्धेची शान समजले जाणारे सेंटर कोर्ट निसरडे झाले आहे. ते खेळण्यास किती योग्य आहे, अशी विचारणा होत आहे. फ्रान्सचा आद्रियन मॅन्नारिनो आणि सेरेना विल्यम्स यांना कोर्टच्या एकाच भागात पडल्यामुळे लढत सोडून द्यावी लागली आहे.

लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेची शान समजले जाणारे सेंटर कोर्ट निसरडे झाले आहे. ते खेळण्यास किती योग्य आहे, अशी विचारणा होत आहे. फ्रान्सचा आद्रियन मॅन्नारिनो आणि सेरेना विल्यम्स यांना कोर्टच्या एकाच भागात पडल्यामुळे लढत सोडून द्यावी लागली आहे. रॉजर फेडररने हे कोर्ट नक्कीच निसरडे झाले असल्याचे सांगितले. 

सात वेळची विम्बल्डन विजेती सेरेना अॅलियासँड्रा सॅन्सोविचविरुद्धच्या लढतीच्यावेळी दोनदा घसरली. उजव्या पायावर स्ट्रॅपिंग करूनच सेरेना कोर्टवर उतरली होती. हाच पाय घसरल्यावर तिने लढत सोडून दिली. दुसऱ्यांदा पडल्यावर तिला नीट उभे राहणेही अशक्य झाले होते. त्यामुळे तिने साश्रूनयनांनी चाहत्यांचा निरोप घेतला. ती स्पर्धेतील अखेरची लढत खेळली असल्याचे मानले जात आहे. 

सेरेना पडण्यापूर्वी एखाद दीड तास फ्रान्सचा आद्रियन पडला होता. त्यामुळे त्याने रॉजर फेडररविरुद्धची लढत सोडून दिली. ‘‘यापूर्वीच्या तसेच यंदाच्या कोर्टमध्ये फारसा फरक नाही. पहिल्या दोन फेऱ्यांच्यावेळी गवत काहीसे निसरडेच असते. स्पर्धेच्या सुरुवातीस गवत सॉफ्ट असते, लढती होत गेल्यावर ते हार्ड होते,’’ असे फेडररने सांगितले. 

ऑल इंग्लंड क्लबने हिरवळीवरील टीका अमान्य केली. कोर्ट नेहमीसारखीच आहेत. यावेळी वातावरणात जास्त ओलसरपणा आहे. त्याचा कोर्टवर काहीसा परिणाम होतोच, असे त्यांनी सांगितले. अर्थात संयोजकांना पहिल्या दोन दिवसांनंतर पहिल्या फेरीतील शिल्लक असलेल्या ५० लढती सलत आहेत. 
- रॉजर फेडरर

जोकोविचचा सहज विजय
विम्बल्डन - अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने आपली घोडदौड कायम राखताना दुसऱ्या फेरीतही सहज विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या केविन पीटरसनचा ६-३, ६-३, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव केला.


​ ​

संबंधित बातम्या